शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, शाही लूकची चर्चा, आदिनाथ कोठारेसह केलंय काम…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 9, 2025 | 10:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rucha vaidya wedding

लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, शाही लूकची चर्चा, आदिनाथ कोठारेसह केलंय काम…

rucha vaidya wedding : मराठी कलाविश्वात अनेक कलाकार मंडळी थाटामाटात लग्न करताना दिसत आहेत. तर काहींनी गुपचूप लग्न उरकल्याचंही पाहायला मिळालं. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने लग्न केल्याचे समोर आले आहे. या अभिनेत्रीच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. ही नुकतीच लग्नबंधनात अडकलेली अभिनेत्री म्हणजे ऋचा वैद्य. पाणी या राष्ट्रीय विजेत्या चित्रपटातून ऋचा वैद्य हा नवा चेहरा सिनेरसिकांच्या भेटीला आला. बालकलाकार म्हणून रसिकांच्या भेटीस आलेली ऋचा पाणी या सिनेमातून अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आली. आता अखेर ऋचा विवाहबंधनात अडकली असून तिच्या विवाहसोहळ्याचे फोटोदेखील समोर आले आहेत.

पाणी चित्रपटाला यश मिळाल्यानंतर ऋचाने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच साखरपुडा सोहळा उरकत आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. यानंतर आता ऋचा केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहील होतं. अखेर ऋचा आणि यश किरकिरे यांचे लग्न झाले असून त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

आणखी वाचा – “काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

View this post on Instagram

A post shared by Amit Kale | Wedding Photography (@amit_kale_photography)

नवऱ्याबरोबरचा लग्नमंडपातील सुंदर असा फोटो शेअर करत ऋचाने “hubby”, असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. अगदी मराठमोळ्या अंदाजात ऋचा फारच सुंदर दिसत होती. तर ऋचाच्या नवऱ्याचाही यावेळी मराठमोळा लूक लक्षवेधी ठरला. यावेळी अभिनेत्रीने सहावारी साडी, नाकात नथ, डिझाइनर ब्लाऊज, भरजरी दागिने परिधान केले होते. तर तिच्या नवऱ्याने केलेला पेशवाई लूकही लक्ष वेधून घेणारा होता. ऋचाच्या लग्नाच्या फोटोंवर सिनेविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – चुकीच्या पद्धतीने खाद्यपदार्थ शिजवणं दीपिका कक्करला पडलं महागात?, लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शिकार आणि…

रिसेप्शनसाठीही ऋचा लाल रंगाच्या डिझाइनर साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. तर तिचा नवरा ब्लेझर सूटमध्ये हँडसम दिसत होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी या सिनेमातून ऋचा समोर आली. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने केली होती. सत्य घटनेवर आधारित या सिनेमाला यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

Tags: entertainmentmarathi actressrucha vaidya wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
dipika kakar News

शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करने नवऱ्यासह रुग्णालयातच साजरी केली ईद, सासऱ्यांकडून मिळाली खास भेट, अभिनेत्रीची तब्येत आता…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.