मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डोळ्यांखालील डाग सर्कल आणि…; आई झाल्यानंतर रात्रभर जागतेय अभिनेत्री, फोटोंमध्ये दिसली अवस्था

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 10, 2026 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sonam Kapoor Dark Circles

डोळ्यांखालील डाग सर्कल आणि…; आई झाल्यानंतर रात्रभर जागतेय अभिनेत्री, फोटोंमध्ये दिसली अवस्था

Sonam Kapoor Dark Circles : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. पण यासोबतच तिला काही अडचणींचाही सामना करावा लागला आहे, ज्यांचा सामना प्रत्येक नवीन आईला करावा लागतो. अलीकडेच, सोनम कपूरने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मुलासोबत बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये तिचा मेकअप फ्री लूक आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे स्पष्टपणे दिसत आहेत. तिचा लेटेस्ट फोटो शेअर करताना सोनम कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘डार्क सर्कल जिंदाबाद’. अभिनेत्रीचे हे कॅप्शन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि महिला चाहत्यांनाही ते खूपच रिलेटेबल वाटले. समोर आलेल्या फोटोंमध्ये सोनम कपूर आपल्या मुलासोबत निवांत क्षण घालवत आहे.

सोनमच्या या पोस्टवरुन हे देखील दिसून आले की, ती तिच्या आयुष्यातील हा टप्पा कोणताही गाजावाजा न करता जगत आहे. जिथे बहुतेक सेलिब्रिटी परफेक्ट फोटो शेअर करतात. सोनमने तिची खरी बाजू दाखवून चाहत्यांची मने जिंकली. फोटोमध्ये सोनमने तिच्या मुलाला छातीशी जवळ घेतलेले दिसत आहे. आई आणि मुलामधला हा बंध अनेकांना भावला. अभिनेत्रीच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे स्पष्टपणे दिसत आहेत, जी ती तिच्या मुलासाठी पूर्ण वेळ देत असल्याचा पुरावा आहे.

आणखी वाचा – अनंत अंबानींच्या वाढदिवसाचा जल्लोष, बॉलिवूड जामनगरीत अवतरलं, रणवीर सिंग ते सलमान खान आणि…

सोनम कपूरने २९ मार्च २०२६ रोजी तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. याआधीही ती एका मुलाची आई होती. सोनम कपूरच्या मोठ्या मुलाचे नाव वायु आहे, ज्याचा जन्म २० ऑगस्ट २०२२ रोजी झाला. दोन्ही भावांमध्ये सुमारे चार वर्षांचे अंतर आहे. सोनम कपूरने ८ मे २०१८ रोजी बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले होते. या जोडप्याने शीख रितीरिवाजानुसार लग्न केले होते. सोनम आणि आनंदचे लग्न खूपच भव्य होते, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व बडे सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

आणखी वाचा – IVF च्या खोट्या बातम्यांवर भडकलं सुप्रसिद्ध जोडपं, लग्नाच्या १० वर्षांनी होणार आहेत पालक, म्हणाले, “आम्हाला विचारा…”

सोनमच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, सोनम कपूर शेवटची क्राईम थ्रिलर फिल्म ब्लाइंडमध्ये दिसली होती, जी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली होती.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
delnaaz irani rajeev paul

टीव्ही अभिनेत्रीने घटस्फोटानंतर घेतली नाही पोटगी, कारण सांगत म्हणाली, "जोडीदाराने कधीच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.