Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide: बॉलीवूडमधील सर्वात ख्यातनाम कला दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई, KBC सारखा टीव्ही शो आणि लगान व देवदास यांसारख्या एव्हरग्रीन चित्रपटांच्या आयकॉनिक सेटच्या मागे असलेला माणूस म्हणजे नितीन देसाई. बुधवारी सकाळी कर्जतमधील त्यांच्या स्वत:च्या स्टुडिओमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले.(Nitin Desai Suicide)
जाणून घ्या कोण होते नितीन देसाई ? (Nitin Desai Suicide)
नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म १९६५ सालचा, त्यांचं शिक्षण वामनराव मुरंजन हायस्कूल, मुलुंड या मराठी माध्यमाच्या शाळेतून झालं.नंतर त्यांनी जे.जे. येथे फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यापूर्वी मुंबईतील स्कूल ऑफ आर्ट आणि एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून पुढील शिक्षण घेतले. नितीन देसाई हे ‘लगान’, ‘जोधा अकबर’ व देवदास सारख्या मोठ्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुंदर, भव्य सेट डिझाइन करण्यासाठी प्रसिद्ध होते. नितीन देसाईंनी कला दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीमध्ये स्वतःच्या कामाची वेगळी अशी छाप पाडली.
हे देखील वाचा- राजकीय मंडळींशी मैत्री ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी खास कनेक्शन, कसा होता नितीन देसाई यांचा संपूर्ण प्रवास?
नितीन देसाई यांचा जीवनप्रवास
नितीन चंद्रकांत देसाई यांनी सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून आपला प्रवास सुरू केला. त्यांची पहिली नोकरी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीश रॉय यांचे चौथे सहाय्यक म्हणून होती. त्यांनी गोविंद निहलानी दिग्दर्शित १९८७ मधील टीव्ही सीरियल ‘तमसच्या’ 26 व्या भागातून सेट डिझाइन केले. नितीन देसाई यांना विधू विनोद चोप्रा यांच्या १९४२ सालच्या ‘अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाने ओळख मिळाली.
आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत, नितीन देसाई यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यात संजय लीला भन्साली यांचा ‘देवदास’ व ‘हम दिल दे चुके सनम’ तर, आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ यांसारख्या अनेक बॉलीवूड चित्रपटांचा समावेश आहे.केवळ चित्रपटच नाही तर लोकप्रिय टेलिव्हिजन रियालिटी शो KBC चा सेट देखील डिझाइन केला आहे. केबीसीच्या सेटवरील कामाबद्दल अमिताभ बच्चन यांनी त्यांचे कौतुक केले आणि शोच्या यशाचे श्रेय देखील अमिताभजींनी नितीन देसाईंना दिले. त्यांच्या इतर काही उल्लेखनीय कामांमध्ये ‘परिंदा’, ‘खामोशी’, ‘माचीस’, ‘बादशाह’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ व ‘राजू चाचा’ यांचा समावेश होतो. नितीन देसाई यांनी ‘सलाम बॉम्बे!’,’आमोक’ त्याचसोबत ‘सच अ लाँग जर्नी’, व ‘होली स्मोक’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसाठी देखील सेट डिझाइन केले आणि इतकेच नाही तर त्यांनी ‘स्लमडॉग मिलेनियर’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटासाठी देखील दोन सेट तयार केले. (Nitin Desai life journy)

कलादिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकिर्दीनंतर, नितीन चंद्रकांत देसाई यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. २००८ मध्ये ‘राजा शिवछत्रपती’ व २०१८ मध्ये ‘ट्रकभर’ स्वप्न नावाचे चित्रपट त्यांनी तयार केले. त्याचसोबत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या टीव्ही शोची निर्मिती देखील केली, हा शो म्हणजे तरुणांसाठी एक प्रकारचा व्यासपीठ ठरला.गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘हॅलो जय हिंद’ सारख्या मराठी चित्रपटातूनही त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. 2005 मध्ये मुंबईच्या बाहेर कर्जत येथे ‘एनडी स्टुडिओ’ नावाचा स्वतःचा स्टुडिओ सुरू केला जिथे ऐश्वर्या राय बच्चनच्या जोधा अकबरचे चित्रीकरण झाले होते.
नितीन देसाई यांना प्राप्त झालेले पुरस्कार
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या सिनेसृष्टीतील योगदानामुळे त्यांना ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ व ‘लगान’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. (Nitin Desai Awards)
नितीन देसाई यांचा मृत्यू
नितीन चंद्रकांत यांनी बुधवारी वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सहकाऱ्यांसह इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे तसेच चाहत्यांमध्येही शोक व्यक्त केला जात आहे.रायगड एसपींनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्हाला कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा मृतदेह त्यांच्या कर्जत येथील स्टुडिओमध्ये लटकलेला आढळला आहे. सेटवरील एका कामगाराने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक स्टुडिओत पोहोचल्यावर त्यांचा मृतदेह लटकलेला दिसला. या प्रकरणातील सर्व पैलू पडताळून पाहण्यासाठी आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत.तसेच महाराष्ट्राचे आमदार महेश बालदी यांनी ‘एएनआय’ सोबत बोलताना सांगितले की, “ते आर्थिक तणावाखाली होते आणि आत्महत्येसाठी हे एकमेव कारण असू शकते.(Nitin Desai Commits Suicide)