शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नीता अंबानींनी घातला मुघल सम्राट शाहजहानचा ऐतिहासिक दागिना, लिलावामध्ये अंबानी कुटुंबियांना केला होता खरेदी, किंमत तब्बल…

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 11, 2024 | 6:32 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Nita Ambani Wore Historical Jewellery

Nita Ambani Wore Historical Jewellery

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींग सोहळ्या नंतर रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ७१ व्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेच्या फायनल प्रसंगी नीता अंबानी यांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या लूकमधील मुघल बादशहाची ‘कलगी’ म्हणून जगप्रसिद्ध असलेला दागिना हा त्यांच्या लूकची शोभा वाढवत होता. नीता अंबानी यांच्या या लूकची व दागिनेही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळते. (Nita Ambani Wore Historical Jewellery)

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात नीता अंबानी यांचा ‘ब्युटी विथ अ पर्पज ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड’ या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासह नीता यांच्या लूकमधील एक खास दागिना पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नीता यांनी परिधान केलेल्या दागिन्यांमध्ये मुघल बादशहाची ऐतिहासिक ‘कलगी’ या दागिन्यांचा देखील समावेश होता. याबद्दल एका सोशल मीडिया अकाउंट वरुन माहिती देण्यात आली आहेत.

Founder and Chairperson of Reliance Foundation Nita Ambani received the 'Beauty With a Purpose Humanitarian Award’ on the occasion of the 71st Miss World Finals, held at the Jio World Convention Centre in Mumbai on 9th March. pic.twitter.com/qSJA4LsuEB

— ANI (@ANI) March 10, 2024

आणखी वाचा- सिद्धू मुसेवालाची आई ५८व्या वर्षी गरोदर, जुळ्या मुलांना देणार जन्म, रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं अन्…

या रिपोर्ट नुसार ही ‘कलगी’ शाहजहान, जहांगीरचा मुलगा आणि 1592-1666 पर्यंत राज्य करणारा पाचवा मुघल सम्राट मिर्झा शहाब-उद-दीन मुहम्मद खुर्रम यांनी परिधान केली होती. या बाजुबंदाची किंमत सुमारे २०० कोटीहून अधिक असल्याचं सांगितलं जातंय. या ऐतिहासिक दागिन्यांवर अनेक मौल्यवान हिरे, मोती यांची डिजाईन असल्याचं दिसतंय तसेच या बाजुबंदाची उंची ही १३.७ सेमी आणि रूंदी १९.८ असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. (Nita Ambani Wore Historical Jewellery)

आणखी वाचा- Video : हॉटेलमध्येच बियरची बॉटल डोक्यावर ठेऊन नाचू लागल्या आजीबाई, स्वतःच शिट्टीही मारली, सगळे बघतच बसले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

नीता आंबानी या नेहमी त्यांच्या फॅशनेबल लूकसाठी चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. या सोहळ्यातील नीता अंबानींच्या चमकदार सोन्याच्या जरीपासून हाताने बनवलेल्या जंगला डिझानची बनारसी साडी आणि त्यावर असलेल्या मीनाकारी वर्कपासून ते या ऐतिहासिक दागिण्यापर्यंत सर्वांची चर्चा सगळीकडे रंगली. नुकताच अंबानी कुटुंबातील अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यातील यांच्या लूकने देखील सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या सोहळ्याला बॉलीवूडसह, हॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.

Tags: Mukesh and Nita Ambaninita ambaninita ambani look
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Adil Khan Wedding

राखी सावंतच्या पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या पत्नीचं लग्नानंतर बदललं आयुष्य, आता जगतये अशी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.