मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राखी सावंतच्या पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या पत्नीचं लग्नानंतर बदललं आयुष्य, आता जगतये अशी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 11, 2024 | 6:51 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Adil Khan Wedding

राखी सावंतच्या पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या पत्नीचं लग्नानंतर बदललं आयुष्य, आता जगतये अशी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचा माजी पती आदिल खान दुर्रानी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ३ मार्च २०२४ रोजी त्याने ‘बिग बॉस’ फेम सोमी खानशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंनी साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आदिल व सोमी यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर सोमी व आदिल एकत्र खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळालं. लग्नानंतर हे जोडपं विवाहित जीवनाचा आनंद घेत आहेत. लग्नानंतरच्या सुखी संसाराची झलक या जोडीने त्याच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर केली आहे. आदिल व सोमी लग्नानंतर प्राणीसंग्रहालयात फिरायला गेले होते. येथून त्यांनी सिंहाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. (Adil Khan Wedding)

लग्नानंतर सोमी तिच्या सासरच्या घरी खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. आदिलने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सोमीने केसात गजरा माळलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आदिल म्हणत आहे की, “आमच्याकडे झाडे आहेत. अम्मीने स्वतःच्या हातांनी सोमीसाठी गजरा बनवला आहे. गजरा माळल्यानंतर सोमीला खूप आनंद होतो”. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये सोमी कॉटन कँडी खाताना दिसत आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. सोमीच्या हातात लाल चुडाही पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – नीता अंबानींनी घातला मुघल सम्राट शाहजहानचा ऐतिहासिक दागिना, लिलावामध्ये अंबानी कुटुंबियांना केला होता खरेदी, किंमत तब्बल…

आदिल व सोमीबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही एका अवॉर्ड शोमध्ये भेटले होते आणि महिनाभरानंतर दोघांनी लग्न केले. त्यांचा विवाह एका खाजगी समारंभानुसार पार पडला. आदिल व राखीबद्दल बोलताना सोमी म्हणाली होती, “मला माहित आहे की आदिलला खूप त्रास झाला आहे. आता आम्ही एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. मला मागे वळून बघायचे नाही. मला फक्त भविष्याकडे पाहायचे आहे”.

आणखी वाचा – ‘मिस वर्ल्ड’साठी प्रियांका चोप्राने दिलं होतं चुकीचं उत्तर, तरीही त्यावर्षी अभिनेत्री विजेती कशी काय ठरली?, काय होता तो प्रश्न?

सोमीच्या आधी आदिलने राखी सावंतसह लग्न केले होते. राखीमुळे आदिल विशेष चर्चेत आला होता. राखीचे हे लग्न वादग्रस्त राहिले. राखीने आदिलवर अनेक आरोप प्रत्यारोप केलेले पाहायला मिळाले. घरगुती हिंसाचाराच्या आरोपामुळे आदिलला तुरुंगातही जावे लागले. जेव्हा राखीला आदिल व सोमीच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा तिने सोमीला कोणीतरी वाचवा, असं म्हटलं. आदिलने यापूर्वी ५-६ लग्ने केली आहेत, असा दावाही तिने केला आहे.

Tags: Adil Khan DurraniAdil Khan Weddingentertainmentrakhi sawant ex husbandsomi khan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
suvrat joshi video

Video : गोव्यामध्ये इतकं मोठं आहे सखी गोखलेचं सासरचं घर, सुव्रत तिथेच आईला अचानक भेटायला गेला अन्…; लेकाला पाहून खाली पडली तेव्हा…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.