‘बिग बॉस १३’ फेम दलजीत कौर आणि तिचा पती केनियास्थित व्यावसायिक निखिल पटेल सध्या चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी दलजीतने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन काही पोस्ट केल्या होत्या, ज्यात तिने निखिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. दलजितने केलेल्या या आरोपानंतर प्रत्युत्तरात निखिलने त्यांचे नाते संपुष्टात आल्याची पुष्टी केली. यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार निखिलने दलजीतला कायदेशीर नोटीस बजावली असल्याचंही समोर आलं. (Nikhil Patel On Daljeet Kaur)
निखिल पटेल यांनी पाठवलेल्या नोटीसनुसार, भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा २००० आणि मुलांचे संरक्षण कायदा २०१२ अंतर्गत दलजीत कौरने सोशल मीडियावर केलेले आरोप खोटे आहेत. निखिलने सांगितले की, दलजीतवर कारवाईचे हे कारण असू शकते. याबद्दल बोलताना निखिल म्हणाला, “जगातील एक सामान्य नागरिक म्हणून, भारत आणि जागतिक स्तरावर ऑनलाइन सुरक्षा कायद्यांमध्ये काय फरक असू शकतो आणि काही लोक त्याचा विनाकारण प्रसिद्धी मिळवण्यासाठी किती फायदा घेतात हे पाहणे खूप त्रासदायक आहे”.
यापुढे ते म्हणाले की, “समाजात नेहमीच असुरक्षित पक्ष असलेल्या आणि ज्यांना कायद्याच्या संरक्षणाची गरज असते, अशा लहान मुलांच्या संमतीशिवाय छायाचित्रे आणि व्हिडीओ फुटेज शेअर करणे बेकायदेशीर आणि निष्काळजी आहे”. निखिल असेही म्हणाला की, “दलजीत कौरच्या टीमने जूनमध्ये केनियाला पोहोचून तिचे उरलेले सामान गोळा केले पाहिजे अन्यथा ते काही धर्मादाय संस्थांना दिले जाईल कारण तिच्यासाठी ते ठेवण्याचा काही अर्थ नाही आणि त्याने तिला याबद्दल अनेकदा सांगितले आहे”.
निखिलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या कायदेशीर टीमने स्पष्ट केले आहे की तो भविष्यात कोणत्याही प्रकारचा छळ सहन करणार नाही आणि जर दलजीतने तिचे बेकायदेशीर कृत्य चालू ठेवले तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल”.