Newborn Baby Emotional Story : सुरुवातीच्या काळात वंशाचा दिवा असावा म्हणून एखाद्या महिलेला कुटुंबाकडून खूप त्रास सहन करावा लागायचा. इतकचं नाही तर असे अनेक पालक आहेत जे मुलगी झाल्यावर नाक मुरडायचे. परंतु आता काहीस हे चित्र बदललेलं दिसत आहे. आजकाल पालक मुलगी आणि मुलांमध्ये कोणताही फरक करत नाही. तर सध्या आई-वडिलांना सांभाळण्यासाठी मुलगा नाहीतर मुलगी पुढाकार घेते अशी काही उदाहरणे पाहता आता एक मुलगीच व्हावी असे अनेकांना वाटते. एकीकडे, लोकांमध्ये मुलींची ओढ वाढत आहे, त्यादरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की आजही काही लोक मुलींना ओझे मानतात आणि जन्मता त्यांना सोडून निघून जातात.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुषमा मोगरी यांनी तिच्या इन्स्टाग्रामवर एक धक्कादायक कथा पोस्ट केली आहे. व्हिडीओमध्ये, तिच्या हातात गोंडस बाळ दिसत आहे, ज्याचा नुकताच जन्म झाला आहे. हे मूल तिच्या आईवडिलांची तिसरी मुलगी आहे, म्हणून कुटुंबातील सदस्य तिचा तिरस्कार करताना दिसत आहेत. ज्या देशात अध्यक्ष एक स्त्री आहे, इतकंच नाहीतर अंतराळात जाणारीही महिलाच आहे, त्या देशात मुलींबरोबर अशी वृत्ती लज्जास्पद आहे.
यापूर्वी महिलेला आणखी दोन मुली आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत, ही त्यांच्या कुटुंबातील तिसरी मुलगी आहे. या मुलीचा जन्म झाला तेव्हा मुलीचे वडील तिला भेटण्यासाठी रुग्णालयात आले नाहीत वा घरात आनंदही साजरा केला गेला नाही. कुटुंबातील सदस्यही हे निर्दोष बाळ रुग्णालयात सोडून गेले. डॉक्टरांनी येथे हार मानली नाही आणि त्यावर व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ३५ दशलक्ष लोकांनी पाहिला होता. आणि हजारो लोकांना त्या डॉक्टरांचे म्हणणे आवडले.
सोशल मिडियावर डॉक्टरांकडून ही कथा ऐकल्यानंतर त्यांना सतत फोन कॉल येत होते. लोक केवळ डॉक्टरांचेच कौतुक करत नव्हते तर कुटुंबातील सदस्यांच्या या कृत्यावरून त्यांना खडेबोल सुनावतानाही दिसले. ही पोस्ट पाहिल्यानंतर, तब्बल सात हजाराहून अधिक लोकांनी मुलाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बाळ दत्तक घेण्याकरिता काय करावे याचा विचार करण्याऐवजी डॉक्टरांनी मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावले. त्याने त्यांना सांगितले की लोकांना या मुलाला दत्तक घ्यायचे आहे. हे ऐकून त्या लोकांना यावर विश्वास नव्हता.
आणखी वाचा – “९९% काश्मिरी हे भारताशी निष्ठावान”, जावेद अख्तर यांचं मोठं विधान, म्हणाले, “पहलगाम हल्ला…”
डॉक्टर पुढे म्हणाले की, ‘हे सर्व जाणून घेतल्याने कुटुंबाला त्यांच्या निर्णयाबद्दल काज वाटली. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि त्यांनी मुलीला पूर्ण प्रेम आणि सन्मानाने आपल्याबरोबर घरी नेण्याचे मान्य केले. या पोस्टवर, नेटकऱ्यांनी कमेंट करुन डॉक्टरांचे आभार मानले आहेत. त्याच वेळी, काही लोक असे म्हणत आहेत की, “अशा मुलास त्यांच्याकडे सोपवायला नको होते. कारण त्यात त्या बाळाची काहीच चूक नव्हती”. त्याच वेळी, काहीजण म्हणाले की, “या मुलीला चांगल्या पालकांची आवश्यकता आहे”.