स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण काही सोप्पी गोष्ट नाही, मात्र मेहनत घेतली तरी ही गोष्ट काही कठीण ही नाही. निश्चित ध्येय, एकाग्रता आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे या परीक्षांत यश नक्कीच मिळू शकतं हे ही तितकच खरं आहे. स्पर्धा परीक्षेसाठी जीवाच रान करणारी एक आशयघन कथा ‘मुसंडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. (musandi marathi film)
या चित्रपटाचे पोस्टर अनावरण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित आणि निर्मित तसेच शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘मुसंडी’ हा चित्रपट येत्या २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

पोस्टर लाँच कार्यक्रमादरम्यान मंत्री संदीपान भुमरे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव पाटील, रामदास कदम, अर्जुन खोतकर, खासदार हेमंत गोडसे, मा. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुहास कांदे, आमदार संजय शिरसाट, आमदार शहाजीबाप्पू पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार शांताराम मोरे, आमदार बालाजी कल्याणकर व चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक सहकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुसंडी’ चित्रपटाला दिल्या शुभेच्छा
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नियोजन ही बाब किती महत्वाची आहे. हे नियोजन कशाप्रकारे करावं हे सांगताना या परीक्षेतल्या अपयशाकडेही सकारात्मक दृष्टीने पहात जिद्दीने यश मिळवता येऊ शकते हे सांगणारा हा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले. वेगळ्या आणि आशयघन विषयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुसंडी’ चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. (musandi marathi film)
====
हे देखील वाचा – ट्रोलिंगवर नेटकऱ्यांना प्रतिउत्तर करत शिवने शेअर केली पोस्ट
====
रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे, सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे यांच्या भूमिका आहेत. राज्यासह देशातील IAS, IPS आणि यशस्वी उदयोजक यांचे मार्गदर्शन घेऊन या चित्रपटाची कथा रचना करण्यात आली आहे. ‘मुसंडी’ चित्रपट २६ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.