हल्ली कोणत्याही गोष्टीची पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल तर चित्रपटांची कथानक रचली जातात. समाजातील कोणतीही घटना, गोष्ट असो त्यावर चित्रपट बनायला वेळ लागत नाही. कारण राजकीय घडामोडींच्या इतिहासातील एक घटना त्या घटनेच्या नावावर सध्या येत असलेल्या चित्रपटाचं नाव चांगलंच चर्चेचा विषय ठरतंय हा चित्रपट आहे ‘आणीबाणी’.
चित्रपटाच्या नावाचा संबंध थेट मूळ घटनेशी म्हणजे राजकारणाशी संदर्भात आहे.आणि या चित्रपटातून थेट राजकारणावर परखड लिखाण केलं आहे प्रसिद्ध लेख अरविंद जगताप यांनी.(Anibani)
‘आणीबाणी’ या चित्रपटात कलाकारांची तंगडी फौज उभी करण्यात आली आहे. कलाकारांच्या या तुकडीत उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर या कलाकारांचा सहभाग आहे.

आणीबाणी या चित्रपटाची निर्मिती कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक यांनी केली असून दिगदर्शनाची धुरा अरविंद जगताप यांच्यासह नवनिर्वाचित दिगदर्शक दिनेश जगताप यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत,पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे.(Anibani)
====
हे देखील वाचा-‘कार्यक्रमात कोणावरही टीका….’ महाराष्ट्राच्या हास्य जत्रेबद्दल राज ठाकरेंचं विधान चर्चेत
====
पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर कलादिग्दर्शन सुधीर सुतार यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय,..किरण कोट्टा आणि मिक्स,.. नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन मंगेश गाडेकर यांनी केले असून या संकलन प्रमोद कहार यांचे आहे.
तर मनोरंजनाची ही आणीबाणी येत्या जून महिन्यापासून चित्रपटगृहांमध्ये लागू होणार आहे.