भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक दिवसांपासून एक बातमी समोर येत आहे. हार्दिक लवकरच त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून घटस्फोट घेऊ शकतो अशी चर्चा आहे. मात्र, ही गोष्ट फक्त सोशल मीडियावर चर्चेत आली असून, यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेलं असताना नताशाच्या एका पोस्टने खळबळ माजली आहे. (Natasha Stankovic Hardik Pandya Divorce)
नताशा स्टॅनकोविकने इन्स्टाग्राम अकाउंटवरआणखी वाचा – वडील विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहोचले देशमुख कुटुंब, मुलांवरील संस्कार पाहून रितेश-जेनेलियाच होत आहे कौतुकएक स्टोरी पोस्ट केली आहे ज्यामध्ये वाहतुकीच्या नियमांचा तक्ता पाहायला मिळत आहे. यावर नताशाने असे काहीतरी लिहिले ज्यामुळे लोकांना शंका आली की नताशा आणि हार्दिकच्या वेगळे होण्याबाबत हा मोठा इशारा असू शकतो. नताशाने इन्स्टावर ड्रायव्हिंग मॅन्युअलशी संबंधित एक साइनबोर्ड शेअर केला आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, “कोणीतरी रस्त्यावर येणार आहे”. ही पोस्ट नताशा व हार्दिक वेगळे होणार असल्याचा संकेत असल्याचं बोललं जात आहे.

सोशल मीडियावरील चाहत्यांना वाटते की, हार्दिक व नताशा वेगळे होतील. नताशाने हार्दिकबरोबरचे तिचे नाते संपुष्टात आणले आहे पण हे तसे आहे की नाही यावर हार्दिक किंवा नताशा यांनी काहीही सांगितले नाही. ४ मार्चला नताशाचा वाढदिवस होता आणि बायकोच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने एकही पोस्ट शेअर केली नाही, तर याआधी तो अनेकदा पोस्ट शेअर करत असे.
मात्र, हार्दिक व नताशा वेगळे होत आहेत, असा दावा करता येणार नाही. नताशाच्या जाण्याने हार्दिक गरीब होऊ शकतो, असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. नताशा- हार्दिकचे २०२० मध्ये लग्न झाले आणि २०२३ मध्ये दोघांनी पुन्हा लग्न केले. त्यांना अगत्स्य पंड्या हा मुलगा आहे. मार्च २०२४ मध्ये हार्दिकच्या आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे नताशाही ट्रोलिंगची शिकार झाली होती. हार्दिकचा भाऊ कुणाल पांड्या अजूनही नताशाच्या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहे. असं असलं तरी त्यांचे चाहते सोशल मीडियावर दावा करत आहेत की, हार्दिक व नताशा यांच्यात आता काहीच उरले नाही.