बुधवार, एप्रिल 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडील विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहोचले देशमुख कुटुंब, मुलांवरील संस्कार पाहून रितेश-जेनेलियाच होत आहे कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 26, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Riteish Deshmukh and Genelia Deshmukh

वडील विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहोचले देशमुख कुटुंब, मुलांवरील संस्कार पाहून रितेश-जेनेलियाच होत आहे कौतुक

मराठी व बॉलीवूड सिनेसृष्टीतील नेहमी चर्चेत असणारं आणि लोकप्रिय कपल म्हणजेच रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख. रितेश व जेनेलिया सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. रितेश-जेनेलिया यांचं आई वडील म्हणून नेहमीच कौतुक होताना पाहायला मिळतं. कारण त्यांनी त्यांच्या मुलांवर केलेले संस्कार साऱ्यांनाच विशेष भावतात. कॅमेरासमोर येताना त्यांची दोन्ही मुलं कायम आदराने हात जोडून नमस्कार करताना दिसतात. त्यांची ही सवय प्रेक्षकांना विशेष आवडते. (Riteish Deshmukh and Genelia Deshmukh)

सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणाऱ्या रितेश व जेनेलियाने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लेक म्हणजेच रितेश देशमुख आहे. राजकारण सोडून रितेशने अभिनयाची आवड जोपासत सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. कुटुंबाच्या पाठिंब्यापायी रितेश स्वमेहनतीवर सिनेसृष्टीत स्वतःची जागा निर्माण केली. आज महाराष्ट्राचे दिवंगत माझी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती आहे.

आणखी वाचा – एक वर्षांपासून बेरोजगार आहेत रत्ना पाठक शाह, स्वतःच केला खुलासा, म्हणाल्या, “सोशल मीडिया…”

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

दिवंगत माझी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशने संपूर्ण कुटुंबासह वडिलांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली आहे. याचे काही फोटो रितेश व जेनेलिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर देखील केले आहेत. जेनेलियाचा देशमुख कुटुंबातील वावर सर्वांनाच माहित आहे. सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून जेनेलिया नेहमीच देशमुख यांच्या घरी वावरताना दिसते. तिच्या सासू-सासर्‍यांनी ही कायम तिच्यावर मुलीसारखंच प्रेम केलेलं पाहायला मिळालं.

आणखी वाचा – लग्नाला तीन महिने पूर्ण होताच तितीक्षा तावडेने नवऱ्याबरोबरचा शेअर केला रोमँटिक व्हिडीओ, म्हणाली, “पुढचे आयुष्यही…”

रितेशने या फोटोला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा’, असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये रितेश, जेनेलिया आणि त्यांची दोन्ही मुलं राहील आणि रियान विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र पाहायला मिळत आहे. रितेश व जेनेलिया यांच्या या पोस्टवर कमेंट करत विलासराव देशमुख यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळत आहे.

Tags: entertainmentmarathi actorRiteish Deshmukh and Genelia DeshmukhRiteish Deshmukh on fathervilasrao deshmukh birthday
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ghabadkund Marathi Movie
Entertainment

मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; प्रितम पाटील सेट करणार नवा ट्रेंड, इमोशन, ड्रामा आणि…

एप्रिल 8, 2026 | 3:00 pm
south actress subhashini found dead 
Entertainment

मृत्यूपूर्वी नवऱ्याचा व्हिडीओ कॉल, भांडणही झालं आणि…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा घरातंच सापडला मृतदेह, दोन वर्षांपूर्वी झालेलं लग्न

एप्रिल 8, 2026 | 1:25 pm
Deepika Padukone Gave A Fitting Reply Trolls
Entertainment

‘धुरंधर २’च्या यशावर दीपिका पदुकोणचे मौन का?, नेटकऱ्यांचा सवाल, उत्तर देत म्हणाली, “तुमच्यापैकी कुणीही…”

एप्रिल 8, 2026 | 12:25 pm
Surabhi Bhave New Instagram Account
Entertainment

“15000 फॉलोवर्स गमावले…”, इंस्टाग्राम बंद होताच अभिनेत्रीची नवी सुरुवात, म्हणाली, “अनेक वेळा शुन्यापासून…”

एप्रिल 8, 2026 | 11:15 am
Next Post
Natasha Stankovic Hardik Pandya Divorce

हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ, संसार वाऱ्यावर, क्रिकेटरच्या बायकोचं घटस्फोटासबंधीत मोठं विधान, म्हणाली, "रस्त्यावर येणार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.