प्रत्येक सामान्य माणसांप्रमाणे कलाकाराचं देखील परदेशात फिरण्याचं स्वप्न असतं.असंच स्वप्न एका विनोदी अभिनेत्रीच पूर्ण झालंय.आणि त्या अभिनेत्रीला ज्यांच्यामुळे परदेशात जाण्याची संधी मिळाली त्यांच्यासाठी तिने एक स्पेशल पोस्ट केली आहे. ही अभिनेत्री आहे नम्रता संभेराव.(Namrata Sambherao US)
रंगभूमीवरील कुर्रर्रर्र नाटक हे सध्या चर्चेत आहे.कुर्रर्रर्र नाटक सध्या अमेरिकेतील प्रेक्षकांचं मनोरंजन करतंय.महिनाभरासाठी ही संपूर्ण टीम तिकडे आहे. तिकडे हे सर्व कलाकार अमेरिकेत विविध ठिकाणी फिरत आहेत.हे त्यांच्या सोशल मीडियावरून समजतंय. तर अमेरिकेची सफर ज्या व्यक्तीमुळे शक्य झाली त्या व्यक्तीसोबत अभिनेत्री नम्रता संभेराव हिने देखील एक फोटो शेअर करत आभार मानले आहेत.

विनोदी अभिनेत्री नम्रता संभेराव हिने विशाखा सुभेदार सोबतचा एक फोटो शेअर केला.The excitement of dreams coming true is beyond the description of words फक्त स्वप्नं रंगवलं होतं अमेरिकेत जाण्याचं, पण इथे येऊन मनोरंजन करायला मिळतंय आणि मुबलक फिरायला देखील मिळतंय ताई thank you so much माझं अनेक स्वप्नांपैकी हे एक स्वप्न पूर्ण करण्याबद्दल. असं म्हणत तिने विशाखाचे आभार मानले आहेत. तर तिच्या या पोस्टला चाहत्यांनी पसंती देखील दिली आहे. तसेच तीच स्वप्न पूर्ण झाल्याने ती देखील फोटोत आंनदी पाहायला मिळतेय.(Namrata Sambherao US)
हे देखील वाचा – ‘मुलं लहान असताना त्यांच्यासोबत वेळ घालवणं, लाड करणं कधी प्रसादला जमलंच नाही पण ….’
विशाखा ही या नाटकाची निर्माती आहे. तसेच तिने या नाटकातूनच निर्माती म्हणून पदार्पण केलं. तर अभिनेता प्रसाद खांडेकर यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. या नाटकातून प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे,विशाखा सुभेदार,नम्रता संभेराव हे कलाकार चाहत्यांना हसण्यासाठी भाग पाडतात.
