मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चं भर पावसात म्युझिक लॉन्च, कलाकार थिरकले, धमाल-मस्ती आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 4, 2026 | 11:17 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mamachya Govyala Jauya Songs

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चं भर पावसात म्युझिक लॉन्च, कलाकार थिरकले, धमाल-मस्ती आणि…

Mamachya Govyala Jauya Songs : ‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी कुशा, बाबा आणि संत्या ही भन्नाट गँग आता मोठ्या पडद्यावर ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटातून गोव्याची धमाल ट्रिप घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यात आता उत्सुकता वाढवली आहे आहे ती मामाच्या एन्ट्रीने. प्रेक्षक ट्रेलरची वाट बघत असतानाच आता चित्रपटातील गाणी भेटीला आली आहेत. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच ठाण्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात चित्रपटातील ‘लागले’ या गाण्याचे अनावरण करण्यात आले तसेच ‘डार्लिंग’ आणि ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या गाण्यांची झलक सादर करण्यात आली. हा दिमाखदार सोहळा ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम, कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन पुष्कर श्रोत्री यांनी केले. या संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटाच्या संपूर्ण टीमने, कलाकारांनी आणि संगीतकारांनी अक्षरशः रंगत आणली. पावसाळी वातावरणात गाण्यांवर ठेका, कलाकारांच्या भन्नाट गप्पा, शूटिंगदरम्यानच्या मजेशीर आठवणी आणि गोव्याच्या ट्रिपमागचे किस्से यामुळे संपूर्ण कार्यक्रम एका धमाल सेलिब्रेशनमध्ये रूपांतरित झाला. यावेळी उपस्थित प्रत्येकालाच हा चित्रपट म्हणजे मैत्री, मस्ती आणि फुल ऑन एंटरटेनमेंटचा डोस असणार असल्याची खात्री पटली आहे.

‘लागले’ हे गाणं पाहून चित्रपटात काय धमाल होणार, याचा अंदाज देतो. रवींद्र खोमणे यांचा जबरदस्त आवाज लाभलेल्या या गाण्याला अनुराग गोडबोले यांचे संगीत तर विजू माने यांचे हटके शब्द लाभले आहेत. गाण्याची कॅची हूक स्टेप आणि मजेशीर सादरीकरणामुळे हे गाणं संगीतप्रेमींना आवडणारे आहे. तसेच यावेळी ‘डार्लिंग’ आणि ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या शीर्षकगीतही सादर करण्यात आले. या तीनही गाण्यांनी चित्रपटाची धमाल, मैत्री आणि गोव्यातील मजेचा अनुभव दिला. ही सगळी गाणी खूपच कमाल असून ही गाणी पाहून मित्र गोव्याचा प्लॅन नक्कीच बनवतील. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “आज सादर झालेली तिन्ही गाणी अतिशय एनर्जेटिक आणि मनोरंजक आहेत. गाण्यांमधून चित्रपटाचा मस्त, बिनधास्त आणि एंटरटेनिंग मूड जाणवतो. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भरपूर हसवेल. संपूर्ण टीमला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.”

आणखी वाचा – निकाह की सात फेरे?, आमिर खान त्याच्या मैत्रिणीशी कोणत्या पद्धतीने लग्न करणार?, येणार इतकेच पाहुणे…

संगीतकार अवधूत गुप्ते म्हणाले, “विजू माने यांच्यासोबत काम करताना नेहमीच काहीतरी वेगळं आणि हटके करण्याची संधी मिळते. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’मधील गाणीही त्याच विचारातून जन्माला आली आहेत. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याचा स्वतःचा फ्लेवर आणि धमाल आहे. विजूने चित्रपटात ज्या प्रकारची मैत्री, मस्ती आणि गोव्याचा उत्साह उभा केला आहे, त्याला संगीताने तितक्याच जोशात साथ देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना ही गाणी नक्कीच आवडतील आणि उर्वरित गाणीही त्यांच्या प्लेलिस्टमध्ये कायमची जागा मिळवतील, याची मला खात्री आहे.’’ चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक विजू माने म्हणाले, “‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा प्रत्येक क्षण मनोरंजनाने भरलेला आहे आणि त्याची सुरुवात या गाण्यांपासून होते. ‘लागले’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही खूप आनंदी आहोत. चित्रपटातील प्रत्येक गाणं वेगळी मजा घेऊन येतं. आता ही धमाल मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांसह आम्हीही आतुरतेने वाट पाहात आहोत.”

आणखी वाचा – कृष्णा-कश्मिरा बरोबरचं भांडण संपलं, सुनीता अहुजांनी केला खुलासा, म्हणाली, “ती माझ्या पाया पडली आणि…”

‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. तर पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत. या चित्रपटात कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका असून ३१ जुलैला हा मैत्रीचा भन्नाट अनुभव घेऊन हा चित्रपट तुमच्या भेटीला चित्रपटगृहात येत आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
akanksha chamola is bisexual

"माझे मुलींशी संबंध आहेत", गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचा ऑन कॅमेरा खुलासा, ढसाढसा रडली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.