Shashank Ketkar On Traffic : ‘मुरांबा’ फेम अभिनेता शशांक केतकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच तो बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो समाजात दिसणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर आपलं परखडपणे मत मांडताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच शशांकने फिल्मसिटीबाहेरील अस्थावस्था पडलेल्या कचऱ्याबाबत भाष्य केलं होतं. यानंतर आता शशांकने ट्राफिक जामवरुन आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमधून शशांकने मढ-आयलंड परिसरातील सत्य परिस्थिती दाखवली आहे. शशांकने या व्हिडीओमधून रस्त्याच्या कामामुळे होणारी जनतेची ओढाताण, बारावीच्या सुरु असलेल्या परीक्षेचं आलेलं केंद्र आणि त्यामुळे पालकांची होणारी धावपळ या सगळ्याला ट्राफिक मॅनेजमेंट, महानगरपालिकेचं मॅनेजमेंट कसं जबाबदार आहे याबाबत भाष्य केलं आहे.
शशांकने हा व्हिडीओ शेअर करत, “रस्त्याची अवस्था भयानक आहे हे माहीत असतानाही १२ वीच्या परीक्षेचं सेंटर इथे कशाला?”,असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटलं आहे की, “नमस्कार. महानगरपालिका आणि वर्कलोड मॅनेज करणारी राजकारणी माणसं यांना माझा नमस्कार. आता प्रेक्षकही म्हणतील की, नेहमी यालाच का ट्राफिकचा त्रास होतो. तर मंडळी हा त्रास तुम्हालाही होतो पण तुम्ही गप्प राहून सहन करता, मी बोलून सहन करतो. मुंबईच स्पिरिट या नावाखाली आपणच आपली ठासून घेतो याचा कुठेतरी आपल्याला राग यायला हवा. कारण या लाईनमध्ये उभ्या असणाऱ्या शेकडो माणसांचा वेळ, कष्ट, प्रदूषणामुळे तब्येतीवर होणारे परिणाम, जीव या सगळ्याची किंमत शुन्य आहे. चित्रपटांमध्ये आपण ऐकलं आहे की मढ आयलंड हे सुंदर ठिकाण आहे तर असं अजिबात नाही आहे. अनेकवर्ष मढच्या रस्त्यांची अत्यंत घाण अवस्था होती, पण इतक्या वर्षांनी आता काम सुरु झालं आहे”.
आणखी वाचा – ‘छावा’साठी प्रेक्षक वेडे, एका दिवसातच कमावले तब्बल इतके कोटी, विकी कौशलचा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करणार
पुढे तो म्हणाला, “हा रस्तात एका बाजूने बंद ठेवतात आणि दुसरी बाजू खणतात असे काम सुरु आहे. या सगळ्या अत्यंत घाणेरड्या वातावरणात आम्ही इथे प्रसन्न चेहऱ्याने शूटिंगला येतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू राजकारण आणि राजकारणाविषयी फार बोलायला जाऊ नको हे डेंजर लोक आहेत. पण माझा त्यांनाच एक प्रश्न आहे. त्यांच्यातील अनेकजण आमच्या इंडस्ट्रीमध्ये रस दाखवतात, निर्माते असतात मग आमची त्यांच्या कामात रस घ्यायला नको. आम्ही त्यांच्या चुका दाखवायला नको. आता एका बस कंडक्टरने मला सांगितलं मागचे दोन तास हे ट्राफिक आहे. मी इथे अर्धा तास झाले अडकलो आहे”.
आणखी वाचा – रणवीर अलाहाबादिया कोणाच्याच संपर्कातच नाही, फोन बंदही अन्…; प्रकरण तापलं असताना गायब असल्याची चर्चा
पुढे शशांक म्हणाला, “मागच्या दोन-तीन महिन्यांपासून वर्षानुवर्षे अडकलेल्या या रस्त्यांचे काम सुरु झाले आहे. हे चांगलं आहे पण आता झालं असं आहे की, सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत आणि मढमधील एका शाळेत बारावी परीक्षा केंद्र आलं आहे. त्यामुळे मुलांना सोडायला पालकांनी लांब-लांब गाड्या पार्क केल्या आहेत आणि रस्त्याच्या कामानिमित्त एक बाजू सुरु असल्याने त्यात आमच्या गाड्या, जेसीबी, ट्र्क त्या पालकांनी लावलेल्या गाड्या या सगळ्यांची गर्दी झाली आहे. यालाच मी म्हणतो की हे महानगरपालिकेचं मिसमॅनेजमेंट आहे. रस्त्याचं काम सुरु आहे म्हणून जर का मढ मधील एखाद शाळेचं ठिकाण केंद्र म्हणून नसतं निवडलं असतं तर बाहेरच्या शाळा केंद्र म्हणून द्यायला कमी आहेत का?”.