शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमचं ठरलं अन्…”, मुग्धा वैशंपायनच्या मेहंदीसोहळ्यातील फोटो आले समोर, नवरीच्या हातावरील मेहंदीची होतेय चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 23, 2023 | 3:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mugdha Vaishampayan Mehendi

"आमचं ठरलं अन्…", मुग्धा वैशंपायनच्या मेहंदीसोहळ्यातील फोटो आले समोर, नवरीच्या हातावरील मेहंदीची होतेय चर्चा

गेले काही दिवस लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच प्रेक्षकांची लाडकी जोडी गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांचा नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला आहे. २१ डिसेंबरला मुग्धा व प्रथमेश बोहोल्यावर चढले आहेत. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. जवळच्या नातेवाईकांच्या व मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुग्धा व प्रथमेश यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. (Mugdha Vaishampayan Mehendi)

मुग्धा व प्रथमेशच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो समोर आले. तसेच दोघांच्या लग्नाआधीच्या विधींच्या साधेपणाचंही सर्वत्र कौतुक करण्यात आलं. ग्रहमख, हळदी समारंभातील त्यांचे फोटो पाहता त्यांच्या साधेपणाची सर्वांनी वाहवा केली. त्यांनतर मुग्धाच्या हळदी समारंभातील फोटोंची झलक पाहण्याची सर्वाना उत्सुकता लागून राहिली होती. अशातच मृग्धा वैशंपायनची मोठी बहीण मृदुलने बहिणीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत शेअर केली आहे.

आणखी वाचा – गौतमी देशपांडेच्या हातावर रंगणार स्वानंद तेंडुलकरच्या नावाची मेहंदी, अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केले नवऱ्याबरोबरचे फोटो

मृदुलने शेअर केलेल्या मुग्धाच्या मेहंदीसमारंभातील फोटोत दोन बहिणींमधील प्रेमाची झलक पाहणं रंजक ठरतंय. याशिवाय मुग्धाच्या हातावरील आकर्षक मेहंदीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाच्या हातावरच्या मेहंदीवर ‘#MGotModak’ असा हॅशटॅग लिहिण्यात आला आहे याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या रिऍलिटी शोमधून मुग्धाला मॉनिटर तर प्रथमेशला मोदक ही उपमा मिळाली होती. तेव्हापासून या दोघांना मोदक व मॉनिटर या नावांनीच ओळखलं जातं. अखेर लग्नातही त्यांनी त्यांची ही नाव हॅशटॅगद्वारे वापरली आहेत.

आणखी वाचा – स्वानंदी व आशिषच्या लग्नाचा सजला मंडप, जय्यत तयारी सुरु, अभिनेत्रीने व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक

याचप्रमाणे अभिनेत्रीच्या दुसऱ्या हातावर “आमचं ठरलंय…” असं लिहिण्यात आलं आहे. मुग्धा व प्रथमेश यांनी सोशल मीडियावर आमचं ठरलं म्हणत पहिल्यांदा प्रेमाची कबुली देत एकत्र फोटो शेअर केला होता. त्यामुळे गायिकेच्या हातावरच्या मेहंदीतही त्यांची ही ओळख पाहायला मिळत आहे.

Tags: entertainmentmugdha vaishampayanmugdha vaishampayan and prathamesh laghatemugdha vaishampayan mehendimugdha vaishampayan mehendi photos
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
majha hoshil na fame actress gautami deshpande and swanand tendulkar shared mehendi look photos on social media

फुलांची सजावट अन् गुलाबी रंगाचा पेहराव; गौतमी देशपांडेच्या मेहंदी लूकने वेधलं लक्ष, फोटो आले समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.