Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी आमचं ठरलं म्हणत चाहत्यांशी गुडन्यूज शेअर केली होती. तेव्हापासून ही जोडी केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. यानंतर अखेर २१ डिसेंबर २०२३ रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकली. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नसोहळ्यात खास फोटो, व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांच्या लग्नातील लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच दोघांच्या लग्नाआधीच्या विधींच्या साधेपणानेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
मुग्धाने लग्नासाठी नऊवारी साडी नेसली होती. तर प्रथमेशचा पेशवाई लूक विशेष लक्षवेधी ठरला. दरम्यान मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नसोहळ्यातील पारंपरिक लूक लक्षवेधी ठरत आहे. चिपळूण येथे मुग्धा-प्रथमेश यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. फुलांनीं, केळीच्या पानांनी सजलेल्या मंडपात मुग्धा-प्रथमेश बोहोल्यावर चढले. दोघांचा लग्नातील पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला.
लग्नसोहळ्यातील मुग्धाच्या साधेपणाच साऱ्यांनी कौतुक केलं. मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नसोहळ्यातील एक आकर्षणाची बाब म्हणजे मुग्धाचे दागिने. मुग्धाने तिच्या लग्नासाठी पारंपरिक दागिन्यांची निवड केली होती. पुण्यवचनावेळी केलेल्या लुकदरम्यान मुग्धाने घातलेल्या पारंपरिक पुतळी हाराने लक्ष वेधून घेतलं. तर नऊवारी साडीवर घातलेल्या पारंपरिक दागिन्यांनी व मुग्धाच्या मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं. मुग्धाच्या व प्रथमेशच्या मोत्यांच्या मुंडावळ्याही खूप खास होत्या.

लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश दोघेही कामाला लागले आहेत. दोघांनी त्यांच्या पहिल्या मैफिलीचा फोटोही शेअर केला होता. यानंतर आज ठाण्यातील उपवन येथील एका संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा कार्यक्रम त्यांनी एकत्र केला असून याचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक खास फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोतील मुग्धाच्या खास मंगळसुत्रचा डिझाइनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुग्धाच्या या छोट्या मंगळसूत्रात डवल्या नसून खास पेंडंट पाहायला मिळालं. मुग्धाने लग्नापर्यंतच्या साऱ्या गोष्टी पारंपरिक पद्धतीने पार पाडल्या असल्या तरी तिचं हे मंगळसूत्र मात्र मॉडर्न अंदाजात असल्याचं कळतंय.