सोशल मिडियावर चर्चेत असणाऱ्या लोकप्रिय कपलच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेश हे त्यांच्या लग्नानंतर बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. सोशल मिडियावर ही जोडी विशेष सक्रिय असलेली पाहायला मिळते. नेहमीच ते दोघेही सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश परदेशात फिरायला गेले असल्याचं समोर आलं आहे. (Mugdha vaishampayan and prathamesh laghate nepal diaries)
मुग्धा व प्रथमेश यांनी नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अगदी शाही थाटामाटात मुग्धा व प्रथमेश यांनी लग्नसोहळा उरकला. लग्नानंतर दोघांनी लगेचच कामाला सुरुवात केली. गाण्यांचे कार्यक्रम करताना ही जोडी दिसली. काहीवेळा ही जोडी कामानिमित्त एकत्र दौरे करतानाही दिसली. मुग्धा व प्रथमेश यांचे देशभरात चाहते आहेत. त्यामुळे बरेचदा महाराष्ट्राबाहेरील चाहत्यांसाठी ही जोडी दौरे करताना दिसली.

दोघांनी त्यांच्या कामातून वेळात वेळ काढत नेपाळ येथे फिरायला गेले आहेत. रोजच्या गायनाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत मुग्धा व प्रथमेश यांनी नेपाळ गाठलं आहे. नेपाळमध्ये भटकंती करतानाचे फोटो प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले आहेत. अशातच मुग्धाच्या एका स्टोरीवरील फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोमध्ये दोघेही नेपाळमधील काठमांडू येथील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नेपाळ, काठमांडू येथील स्पेशल खाद्यपदार्थ दिसत आहेत. या नेपाळच्या खाद्यपदार्थांवर त्यांनी खास ताव मारला आहे.
“आत्म्यासाठी अन्न, डाएट वगैरे सगळं भारतातच ठेवून इकडे आलो”, असं कॅप्शन देत डाएट विसरुन ही जोडी नेपाळच्या खाद्यसंस्कृतीवर भाळली आहे. याशिवाय नेपाळ येथे जंगल सफर करताना ही जोडी दिसली आहे. शिवाय पशुपतीनाथ इथे मुग्धा-प्रथमेश यांनी देवदर्शनही केले आहे. मुग्धा-प्रथमेश यांनी नेपाळमधील मनाकमना, पोखरा फेवा लेक, फिश्तैल, गुप्तेश्वैर महादेव केव्ह अशा ठिकाणी भ्रमंती केली असून याची खास झलक त्यांने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.