reema lagoo and vivek lagoo : सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं दोन दिवसांपूर्वीच निधन झाले. एका शिस्तप्रिय नटाच्या जाण्याने सिनेसृष्टी हादरली. नाटक, मालिका, चित्रपट यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत विवेक यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. संबंध सिनेसृष्टीतील कलाकारांपासून ते चाहत्यांना त्याच्या जाण्याने दुःख झाले. विवेक लागू हे सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती आहेत. रीमा लागू गेल्या आठ वर्षांपूर्वीच आपल्या सर्वांना सोडून गेल्या. २०१७ मध्ये रीमा लागू यांचे निधन झाले. विवेक लागू आणि रीमा लागू यांचा काही कारणास्तव घटस्फोट झाला होता. त्यांनी त्यांच्या घटस्फोटाचे कारण कधीच कोणाला सांगितले नाही. घटस्फोटानंतरही रीमा लागू त्यांच्या सासरकडचे नाव लावत असत.
विवेक लागू आणि रीमा लागू यांना एक मुलगी आहे. विवेक व रीमा यांची लेक मृण्मयी लागू-वायकुळ हीदेखील सिनेविश्वात सक्रिय आहे. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत मृन्मयीने लेखक म्हणून बरीच जबाबदारी सांभाळली आहे. इतकंच नाही तर तिने अभिनेत्री म्हणूनही बरंच काम केलं आहे. वडिलांच्या जाण्याने मृण्मयी पूर्णता कोसळली. भावुक पोस्ट शेअर करत तिने तिच्या भावना मांडल्या. यानंतर आता मृण्मयीची आणखी एक भावुक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
मृण्मयीने रीमा लागू यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट लिहिली आहे. यावेळी तिने तिच्या आई-वडिलांचा एकत्र काम करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. आणि त्यात तिने कॅप्शन देत म्हटलं आहे की, “एकत्र काम करताना ते दोघंही सर्वात जास्त आनंदी असायचे. तेव्हा हसायचे, चेष्टा करायचे, भांडायचे, एकमेकांशी गप्पा मारायचे. या आयुष्यात असा अनुभव घेण्याचा बहुमान सगळ्यांना मिळत नाही. आज तिचा वाढदिवस आहे. ती आम्हाला आठ वर्षांपूर्वी सोडून गेली आणि शेवटी तो म्हणाला, ‘आता पुरे झालं, मला जायचंय’, आणि मग तो १९ तारखेला निघून गेला”.
आणखी वाचा – मराठी अभिनेत्याचं टोकाचं पाऊल, काम मिळत नसल्यामुळे आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली
शेवटी तिने भावुक होतं लिहिलं आहे की, “मला आशा आहे की, तुम्ही दोघंही आज एकत्र असाल. मला तुमची खूप आठवण येतेय पण, त्यापेक्षाही मी तुम्हा दोघांना एकत्र पाहणं जास्त मिस करत आहे. शेवटी आता तुम्ही एकत्र आहात हेच माझ्यासाठी समाधानकारक आहे”





