प्राण्यांची आवड असणारे प्राणीप्रेमी नेहमी आपल्या आजूबाजूला फिरकताना दिसतात. एखाद्या पर्यटनास्थळी गेल्यावरही एखादा वेगळा पक्षी, प्राणी पाहायला मिळाला की, हे प्राणीप्रेमी खूश होतात. पण या सगळ्या प्राण्यांचा जवळ जाणं कितपत योग्य आहे? हाही प्रश्नच आहे. कित्येकदा एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास येते. पर्यटनस्थळी फिरायला आलेले पर्यटक माकडांबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याबरोबर खेळतात. खाऊ घालतात आणि मग फोटो काय अन् व्हिडीओ काय… हा सगळा खेळच आहे असं पर्यटकांना वाटतो. पण कोणत्या प्राण्याला कितपत जवळ केलं पाहिजे? हे लोकांना लक्षातच येत नाही. माकडांनी हल्ला केला असल्याच्या बऱ्याच घटना समोर येतात. आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे. (Monkeys attack viral video)
तेलंगणामधील करीमनगर येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये माकडांचा कळपच महिलेवर हल्ला करताना दिसत आहे. महिला घराबाहेर कचरा काढत असताना अचानक माकडांचा कळप तिथे आला. कळपामधील एका माकडाने त्या महिलेचा चक्क पदरच खेचला. हा संपूर्ण प्रकार नक्की काय? हे त्या महिलेला कळेनाच. काही कळायच्या आतच कळपातील दुसऱ्या माकडाने तिच्यावर हल्ला केला. तिला चक्क जमिनीवर ढकललं. महिला या हल्ल्यात खाली पडली.
पाहा व्हिडीओ
जमिनीवर पडल्यानंतर त्या कळपातील आणखी एक माकड चक्क तिचे चप्पल ओढताना दिसत आहे. व्हिडीओतील महिलेला हा संपूर्ण प्रकार पचनीच पडेना. माकडांनी केलेला हल्ला पाहून समोरच्या घरातील शेजारी धावून आले. पुढे अजून काही घडण्याच्या आत शेजाऱ्यांनी ओडण्यास सुरुवात केली. हातात काठी घेऊन एका व्यक्तीने सगळ्या माकडांना पळवून लावलं. या हल्ल्यामध्ये महिला जखमीही झाली.
आणखी वाचा – Video : आईच्या मृतदेहासमोर दोन भावांमध्ये राडा, लेक चितेवर झोपला अन्…; स्मशानभूमीत पुढे असं काही घडलं की…
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही हैराण झाले. याआधीही उत्तरप्रदेशमध्ये एक अशीच घटना घडली होती. माकड एका मॉलमध्ये शिरला. त्यानंतर सगळ्यांनी एकच तारांबळ उडाली. त्याने मॉलमध्ये आलेल्याच एक महिलेवर हल्ला केला. तो इथवरच थांबला नाही. माकड तिची चप्पल घेऊन पळाला. महाराष्ट्रातही अनेक भागांत किंवा पर्यटनस्थळी लोक माकडांना खाऊ घालतात. पण अशावेळी विशेष खबरदारी घेतली पाहिजे ही या व्हिडीओमधून मिळालेली शिकवण आहे.