Saif Ali Khan Attacked : अभिनेता सैफ अली खानचा जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालक भजनसिंग राणाला बॉलीवूड गायक मिका सिंगने एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी वेळीच रुग्णालयात नेल्याने अभिनेत्याचे प्राण वाचले. गेल्या आठवड्यात सैफवर त्याच्या वांद्रे येथील घरात हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर त्यांना ऑटोरिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. ड्रायव्हरने त्याला दवाखान्यात नेलेच, पण त्याच्याकडून पैसे घेण्यासही नकार दिला. या प्रकरणानंतर आता मिका सिंगने भाग घेत भाष्य केलं आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यापूर्वी सैफ अली खानने रिक्षा चालक भजन सिंगची भेट घेतली. यावेळी सैफ सहत्याच्या संपूर्ण कुटुंबाने भजन सिंगचे आभार मानले.
मिका सिंगने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “मला ठाम विश्वास आहे की भारताच्या आवडत्या सुपरस्टारला वाचवल्याबद्दल तो किमान ११ लाख रुपयांचे बक्षीस पात्र आहे. त्याचे धाडसाचे कृत्य खरोखरच कौतुकास्पद आहे. शक्य असल्यास, तुम्ही कृपया त्याचे संपर्क तपशील माझ्याबरोबर शेअर करु शकता का? मला त्याचे कौतुक म्हणून एक लाख रुपयांचे बक्षीस द्यायचे आहे”.
आणखी वाचा – जीव वाचवणाऱ्या रिक्षा चालकाला सैफ अली खानने दिले इतके रुपये, भेटीदरम्यान म्हणाला, “कोणतीही मदत हवी असेल तर…”

एका सूत्राने आमचे सहकारी ETimes ला सांगितले की, सैफ अली खानने ऑटो-रिक्षा चालकाला ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे. मात्र, चालकाने पैशांबाबत काहीही भाष्य केले नाही. पैशाची मागणी नाही, दिले तर ठीक, दिले नाही तर ठीक, असे ते म्हणाले होते. सैफ आणि ऑटो-रिक्षा चालकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ड्रायव्हरने आयएएनएसला सांगितले की सैफच्या पीएने त्याला कॉल केला होता. जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा सैफच्या संपूर्ण कुटुंबाने त्याचे आभार मानले. सैफबरोबर ४-५ मिनिटे भेट झाली. १५ जानेवारीच्या रात्री उशिरा घरात घुसलेल्या हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केल्याची माहिती आहे.
मुलांना आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी सैफने आरोपीला समोरुन घट्ट पकडले. अभिनेत्याच्या तावडीतून सुटण्यासाठी आरोपीने हल्ला केला होता. तो चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता. हे सैफचे घर आहे हे त्याला माहीत नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजाद असे आरोपीचे नाव असून तो बांगलादेशचा रहिवासी आहे. वांद्रे न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तेथे त्याची चौकशी करण्यात येत आहे.