Kartiki Gaikwad Baby Birthday : ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ची विजेती आणि लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड नेहमीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. गायन क्षेत्रात कार्तिकीने तिच्या जादुई आवाजाने स्वतःच असं स्थान निर्माण केलं. तर ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे कार्तिकीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. कार्तिकी सध्या गायनाबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्यात रमली आहे. कार्तिकीने २०२० मध्ये लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यांनतर सुखी संसारामध्ये ती रमत गेली. कार्तिकी नवऱ्याबरोबरचे अनेक फोटो-व्हिडीओ नेहमीच शेअर करताना दिसते. लग्नाच्या बातमीनंतर गेल्या वर्षी कार्तिकीने आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. कार्तिकीने आई झाल्याची गोड बातमी देत साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
आई झल्यानंतर कार्तिकी सध्या तिचं आईपण एन्जॉय करत आहे. गेल्याच महिन्यात कार्तिकीने लेकाचा चेहरा दाखवण्यासाठी युनिक स्टाइल निवडली. मुलासाठी तिने खास गाणं प्रदर्शित केलं आहे. खास अंगाई गीत तिने तिच्या युट्युब चॅनलद्वारे प्रेक्षकांसमोर आणलं.या गाण्याच्या व्हिडीओद्वारे तिने मुलाला सगळ्यांसमोर आणलं आहे. मात्र आता लेकाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कार्तिकीने तिच्या लेकाबरोबरचे काही सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याची साऱ्यांना ओळख करुन दिली आहे.
“रिशांक कार्तिकी रोनित पिसे”, असं कॅप्शन देत कार्तिकीने तिच्या नवऱ्याबरोबरचे आणि मुलाबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये कार्तिकी व रोनित लेकाबरोबर खूप खुश दिसत आहेत. कार्तिकीचं बाळ दिसायला फारच गोड आहे. लेकाच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकीने तिच्या चाहत्यांना लेकाची पुन्हा एकदा सुंदर अशी झलक दाखविली आहे. या फोटोमध्ये कार्तिकी आईपणात खूप रमलेली दिसत आहे. तिच्या या फोटो पोस्टवर अनेकांनी कमेंट करत कार्तिकीच्या लेकावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
२०२०मध्ये कार्तिकी व रोनितचं थाटामाटात लग्न झालं. कार्तिकीचं लग्न म्हणजे सगळ्यांना सुखद धक्का होता. कार्तिकीने तिचं डोहाळेजेवणही अगदी शाही पद्धतीने केलं. आता आयुष्यातील एक नवा टप्पा ती नव्याने जगत आहे. सध्या कार्तिकीने तिच्या लेकाची नव्याने करुन दिलेली ओळख साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.