कलाकारांच्या खासगी आयुष्यात एखादी घटना घडली की, ती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरते. पण बऱ्याचदा घडलेला प्रसंग कलाकाराच्या बाबतीत नसला तरी खोट्या बातम्या पसरवल्या जातात. असंच काहीसं गायक अभिजीत सावंतबाबत घडलं होतं. अभिजीतच्या मित्राचा अपघात झाल्यानंतर तो त्याच्या मदतीसाठी धावून गेला. अभिजीत घटनास्थळी पोहोचला मात्र जमलेल्या गर्दीने त्यालाच दोष देण्यास सुरुवात केली. इतकंच काय तर त्याला पोलिस स्टेशनलाही सकाळी पाच वाजेपर्यंत बसून राहावं लागलं. या संपूर्ण प्रकारानंतर अभिजीतला मोठा मनस्ताप झाला होता. तेव्हा नक्की काय घडलं होतं? हे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. (Abhijeet sawant accident case)
मारायला गर्दी जमली
अपघात मित्राचा मात्र बदनामी अभिजीतची झाली. दारु पिऊन आला असल्याचे आरोप अनेकांनी केले. ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “विलेपार्ले-सांताक्रुझ भागात माझ्या मित्राचा अपघात झाला होता. अपघातानंतर तिथे गर्दी जमली होती. तिथे मारामारीही झाली. पण संपूर्ण बातमी ही माझ्यावरच झाली. पोलिस स्टेशनमध्ये मी मित्रासाठी गेलो. पण त्याला वाचवण्यासाठी गेलो असताना मी स्वतः तिथे पाच वाजेपर्यंत बसून राहिलो”.
आणखी वाचा – Video : CSMT–अंबरनाथ लोकलमध्ये पुरुषाकडून महिलेला जोरदार मारहाण, बॅग उचलून मारत राहिला अन्…; भयंकर घटना समोर
मित्रांचा अपघात झाल्यानंतर…
“दुसऱ्या दिवशी अशी बातमी आली की, अभिजीत सावंत आणि त्याचा मित्र दारु पिऊन गाडी चालवत होते. सुरेश वाडकर यांच्यासह माझी मिटींग होती. माझे तीन मित्रही या मीटिंगमध्ये होते. मीटिंग संपल्यानंतर ते तीन मित्र निघाले आणि त्यांचा अपघात झाला. मी त्यांच्या मागून होतो. अपघातानंतर मित्रांनी मला फोन केला. त्यांना शोधत शोधत मी तिथे पोहोचलो होतो. तिथे चार मुलीही होत्या. मग मदतीसाठी मलाही जावं लागलं. पण अपघाताच्या ठिकाणी जमा झालेले लोक मलाच दोष द्यायला लागले. तू दारू पिऊन आला आहेस असं मला बोलायला लागले”.
पोलिस स्टेशनबाहेर तुफान गर्दी जमली तेव्हा…
“चला मी त्या परिस्थितीमध्ये लोकांनी बोलणं गृहित धरलं. पण पोलिस स्टेशनमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा तिथे सगळी मीडिया होती. तेव्हा मी सगळ्यांचे वेगळेच चेहरे पाहिले. पोलिसांनी आम्हाला आतमध्ये बसवलं. त्यांना माहिती होतं की, आम्ही दारू प्यायलो नाही. पोलिस स्टेशनमध्ये आम्ही एसी रुममध्ये बसलो होतो. तिथे एका मुलाला मारत होते. कुत्र्यासारखं त्याला मारत होते. पण आम्हाला तुम्ही बिर्याणी वगैरे खाणार का? विचारत होते. तितक्यात एक माणूस आतमध्ये आला म्हणाला, अभिजीत सावंत कोण आहे? त्याला बाहेर काढ असं ओरडायला लागला. पोलिस स्टेशनबाहेर तुफान गर्दी जमली होती. फक्त मला मारण्यासाठी लोक जमले होते. मी ना मारहाण केली, ना अपघात केला ना तिथे उपस्थित होतो. तरीही माझ्यावरच लोक ओरडत होते. माझ्यावरच केस झाली”. अभिजीतबरोबर घडलेला हा संपूर्ण प्रकार धक्कादायक होता.