शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2024 | 12:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Avdhoot gupte mother passed away

सुप्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्तेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवधूत गुप्तेच्या आईचं निधन झाली असल्याची बातमी समोर येत आहे. प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मुंबईच्या व्होकार्ट रुग्णालयात अवधूतच्या आईवर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याचं समोर आलं. अंत्यदर्शनानंतर दौलतनगर स्मशानभूमी, बोरिवली पूर्व येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. (Avdhoot gupte mother passed away)

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते ‘खुपते तिथे गुप्ते’ या नव्या कार्यक्रमामुळे चर्चेत आला. मराठीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून त्याला ओळखही मिळाली. त्याने त्याच्या गाण्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अवधूतची आई मृदगंधा गुप्ते यांच्या निधनाने गुप्ते कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

आणखी वाचा – वैष्णोदेवी दहशतवादी हल्याप्रकरणी मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी व्यक्त केला राग, सोशल मीडियावर भयावह दृश्य शेअर करत म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Avadhoot🎵 Gupte🎶 (@avadhoot_gupte)

अवधूतच्या आईच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी सिनेविश्वातून त्याच्या आईसाठी श्रद्धांजली वाहिली जात आहे. अवधूत गुप्तेचं जुनं घर बोरिवली येथील श्रीकृष्ण नगर परिसरात आहे. तर त्याच्या याच घरी त्याच्या आईचं पार्थिव नेण्यात येणार आहे. मृदगंधा गुप्ते या काही दिवसांपासून आजारी असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानचं त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Tags: avdhoot gupteavdhoot gupte motherAvdhoot gupte mother passed awayentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
neena kulkarni

Video : पापलेट, कोळंबी खेकडे अन्…; नीना कुळकर्णींनी नवऱ्याच्या आठवणीत बनवला खास बेत, माशांवर मारला ताव, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.