शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Vijay Kadam Death : सुप्रसिद्ध मराठी अभिनेते विजय कदम यांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 10, 2024 | 10:21 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actor Vijay Kadam Passed Away

अभिनेते विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज अपयशी

Vijay Kadam Died : मराठी कलाविश्वातून सर्वांना धक्कादायक बातमी समोर आली. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले आहे. मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका अगदी लीलया पार पाडणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. कर्करोगामुळे त्यांना अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. पण अखेरीस कर्करोगाशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता ओशिवरा अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी १९८०च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारुन आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.

आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे विजय कदम काही काळ मनोरंजन सृष्टीपासून लांब होते आणि याचं कारण म्हणजे त्यांचं आजारपण. विजय कदम यांनी कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली. विजय कदम यांनी बालकलाकार म्हणून सिनेविश्वात पदार्पण केले. ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बाल नाटकात हवालदाराची भूमिका साकारुन त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर सिनेविश्वात त्यांनी त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरुच ठेवला. विनोदी अभिनयाने त्यांनी आजवर प्रेक्षकांना खळखळवून हसवले. आज हा हास्यवीर काळाच्या पडद्याआड गेला आहे.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींच्या आदेशावरुन किर्लोस्कर बंगल्यात होणार मंगळागौरचे खेळ, दिशा-दामिनीचा नवा प्लॅन, कार्यक्रमात आणतील का अडथळा?

विजय कदम यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. विजय कदम यांनी काही दिवसांपूर्वीच ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला. ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल व या आजारपणातल्या त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितले.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : पोरांसमोर मिरवतात, तुम्हाला पुरस्कार देणाऱ्यांनाही पश्चाताप होत असेल; वर्षा उसगांवकरांना नको नको ते बोलली जान्हवी, प्रेक्षकांचा संताप

यावेळी विजय कदम यांनी असं म्हटलं की, “याचे सगळे श्रेय माझी पत्नी व माझा मुलगा गंधार यांची साथ मिळाली. हे दोघे माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. तसंच हे एक वाईट स्वप्न समजून मी यातून लवकर बाहेर पडलो. शक्यतो यातून लवकर बाहेर पडत नाहीत. पण मी पडलो आणि नशिबाने चांगले डॉक्टर मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व माझ्या पत्नीच्या साथीमुळे मी यावर यशस्वी मात करु शकलो असं मला वाटतं”

Tags: marathi actorvijay kadam deathVijay Kadam Passed Away
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Vijay Kadam Death

Vijay Kadam Death : कर्करोगामुळे विजय कदम यांना करावा लागलेला वाईट प्रसंगांचा सामना, पत्नी म्हणालेल्या, "कुणालाच सांगितले नाही कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.