गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘गिरगांव शोभायात्रा २०२५’मध्ये ‘गुलकंद’ची हवा, चित्रपटातील कलाकारांना भेटण्यास चाहत्यांची तुफान गर्दी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 31, 2025 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gulkand Movie Team In Girgaon Shobhayatra 2025

'गिरगांव शोभायात्रा २०२५'मध्ये 'गुलकंद'ची हवा, चित्रपटातील कलाकारांना भेटण्यास चाहत्यांची तुफान गर्दी

Gulkand Movie Team In Girgaon Shobhayatra 2025 : हिंदू नवर्षाचा शुभारंभ असलेला गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल ताशांचा गजर, झांज, लेझीमच्या तालावर नटूनथटून पारंपरिक वेषात नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुका, शोभायात्रांमधून मराठी भाषा कशा जपायची याशिवाय समानता, एकता याचे गुढी उभारुन संदेश देण्यात आले. यंदाही मुंबईतील गिरगाव परिसरात शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात, जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. याचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नऊवारी, पैठणी साड्या त्यावर दागिण्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल असा पेहराव करत मराठमोळ्या अंदाजात महिलांनी शोभायात्रेची शोभा वाढविली.

गिरगांवची शोभायात्रा पाहायला संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या शहरांमधील लोक गर्दी करतात. गिरगांवची शोभायात्रा हा एक सण आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या या गिरगांवच्या शोभायात्रेत एका मराठी चित्रपटाची हवा पाहायला मिळाली. हा चित्रपट म्हणजे ‘गुलकंद’. ‘गुलकंद’ या मराठमोळ्या चित्रपटाची टीम गिरगांवच्या शोभायात्रेत झळकली. यावेळी सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे, जुई भागवत ही चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित होती. तर लेखक, दिग्दर्शक सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांचीही उपस्थिती दिसली.

आणखी वाचा – तलवारबाजी, शिस्तप्रिय अन्…; मकरंद अनासपुरेंकडून लेकाचं भरभरुन कौतुक, बाप-लेकाची पहिलीच मुलाखत

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

गुढी पाडव्यानिमीत्त ‘गुलकंद’ चित्रपटाची टीम गिरगाव शोभा यात्रेत पोहोचली आणि शोभायात्रेत आलेल्या सर्वांनी त्यांची झलक पाहण्यास गर्दी केलेली पाहायला मिळाली. यंदाच्या शोभायात्रेत ‘गुलकंद’च्या टीमची भरपूर चर्चा रंगली. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित ‘गुलकंद’ या चित्रपटात दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे. ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ व ‘वेटक्लाउड प्रॉडक्शन्स’ निर्मित ‘गुलकंद’ या फॅमकॉम चित्रपटात ढवळे आणि माने या दोन जोडप्यांच्या नात्यातील गंमतीदार क्षण, विनोदी संवाद, नोकझोक अशी मनोरंजनाची उत्तम मेजवानी पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या पाच वर्षातच नवऱ्याचं निधन, लेक पदरात अन्…; सुरेखा कुडचींनी स्वतःला कसं सावरलं?, सांगितला ‘तो’ काळ

‘गुलकंद’ या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारख्या तगड्या कलाकारांचा समावेश या चित्रपटात आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १ मेपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Tags: Girgaon Shobhayatra 2025gulkand movieGulkand Movie Team In Girgaon Shobhayatra 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Next Post
Aditi Dravid Engagement

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा, लूकने वेधलं लक्ष, कोण आहे होणारा पती?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.