शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुर्दाड बघ्यांचं काय करायचं?”, वसई हत्या प्रकरणाबाबत प्रसिद्ध दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट, म्हणाला, “पोलिसांचा धाक आहे का?”

Saurabh Moreby Saurabh More
जून 19, 2024 | 11:52 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi director Sameer Vidwans shared an angry post on yesterday’s Vasai murder case.

“मुर्दाड बघ्यांचं काय करायचं?”, वसई हत्या प्रकरणाबाबत प्रसिद्ध दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट, म्हणाला, "पोलिसांचा धाक आहे का?"

‘आनंदी गोपाळ’, ‘डबलसीट’, ‘टाईमप्लीज’, ‘क्लासमेट्स’, ‘लोकमान्य’, ‘लग्न पहावे करून’ अशा अनेक बऱ्याच चित्रपटांचे दिग्ददर्शन करुन समीरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. समीर अनेकदा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन सामाजिक आणि राजकीय विषयावरही भाष्य करत असतो. अशातच त्याने नुकत्याच वसईमध्ये झालेल्या तरुणीच्या हत्येबद्दल सोशल मीडियाद्वारे भाष्य केलं आहे.

वसईतील गावराई पाडा येथे मंगळवार सकाळी थरकाप उडवणारी घटना घडली. भररस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे मुंबईसह उपनगरात खळबळ उडाली असून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. याच घटनेवर समीरने भाष्य केलं आहे. समीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या घटनेबद्दल तीव्र शब्दांत त्याचे मत मांडले असून यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “वसईत एका मुलीचा तिच्या तथाकथित प्रियकराने दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष निर्घृण खून केला. हे असं वारंवार होत असतं. भयानक आहे हे. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का? मुर्दाड बघ्यांचं काय करायचं हे प्रश्न आहेतच’.

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की,. “आता असं वाटत नाही का की शाळांमधून (मराठी, इंग्रजी, महानगरपालिका, खासगी किंवा इतर) सर्व ठिकाणी मानसशास्त्र हा विषय असायला हवा? मानसोपचार तज्ज्ञ/समुपदेशक बोलावून लहानपणापासून गोष्टी शिकवायला हव्यात? पालकांचेही वेळोवेळी सेशन्स व्हायला हवेत? मला तरी असं वाटतं, की याचा गांभीर्याने विचार करायला हवा. प्रयत्न तरी नक्कीच व्हायला हवेत”.

आणखी वाचा – अवघ्या २ दिवसांत सुरु होणार ‘बिग बॉस ओटीटी ३’, तिसऱ्या पर्वात ‘हे’ स्पर्धक होणार सहभागी, जाणून घ्या…

नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव व आरती यादव या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहितला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत होती. या भांडणातून रोहितने आरतीला अडवलं आणि दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहितनं आपल्याबरोबर आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात आरती गतप्राण झाली.

आणखी वाचा – रुपालीने अद्वैतवरच केला नवीन शक्तीचा वापर, नेत्रा गरोदर असल्याची माहिती अद्वैतच विरोचकापर्यंत पोहोचवणार, कुणाचा बळी जाणार?

दरम्यान, वसईतील या हत्येप्रकरणी अनेकांनी सोशल मीडियाद्वारे संतापजनक पोस्ट शेअर केल्या आहेत. याप्रकरणातील आरोपी रोहित यादवला अटक करण्यात आली आहे. शिवाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर या भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Tags: Sameer VidwansSameer Vidwans angry on Vasai Murder CaseVasai Murder Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Abhishek Bachchan New Home

अभिषेक बच्चनने बोरिवलीत खरेदी केले एक नव्हे तर तब्बल सहा घरं, किंमत ऐकून व्हाल थक्क

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.