Vandana Gupte injury : सध्या सर्वत्र पावसानं जोर धरलेला पाहायला मिळतोय आणि या पावसामुळेच अनेकांचे हालही झालेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीला ही पावसाचा खूप मोठा फटका बसला असल्याचे समोर आले. या अभिनेत्री म्हणजेच वंदना गुप्ते. पावसामुळे त्यांचा एक छोटासा अपघात झाला आहे याबाबत त्यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती शेअर केली. वंदना गुप्ते यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये त्यांच्याबरोबर त्यांचा नातूही पाहायला मिळतोय. अपघाता बद्दल माहिती देत त्यांनी नाटकाचे प्रयोग ही रद्द झाल्याचे म्हटलं आहे.
मराठी नाटक, मालिका, चित्रपट यांमधून नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा पावसामुळे छोटासा अपघात झाला आहे. सोशल मीडियावर वंदना गुप्ते बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या पाहायला मिळतात. त्या नेहमी त्यांचे फोटो-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या या छोट्याशा अपघाताबद्दल सांगितल आहे आणि त्यांच्या ‘कुटुंब कीरर्तन’ या नाटकाचा प्रयोग रद्द झाल्याबाबत माहिती दिली आहे.

या व्हिडीओमध्ये वंदना गुप्ते असं म्हणतात, “मला तुम्हाला सांगायचं आहे की, मी परवा पावसाच्या पाण्यात पाय घसरून पडले. त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली आहे. मला चालायलाही भयंकर त्रास होत आहे. दुखापतीमुळेच ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाचा १८ सप्टेंबरचा पुण्यातला आणि १९ सप्टेंबरचा बोरिवलीचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप दुःखदायक आहे. मी माझ्या सर्व प्रेक्षकांना सॉरी म्हणते”.
आणखी वाचा – ‘३ इडियट्स’ फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वंदना यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांचा नातू रियान त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देताना दिसतोय. या अपघातात वंदना यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना नीट चालता येत नसल्याच समोर आले आणि याचमुळे त्यांच्या ‘कुटुंब कीरर्तन’ या नाटकाचे प्रयोगही रद्द करण्यात आले. या नाटकात वंदना गुप्ते यांच्यासह अभिनेत्री तन्वी मुंडले, संकर्षण कऱ्हाडे ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. रंगभूमीवर या नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. वंदना यांनी ‘गगनभेदी’, ‘रमले मी’, ‘रंग उमलत्या मनाचे’, ‘अखेरचा सवाल’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांमधून महत्वपूर्ण काम केले. तर अनेक मालिका, चित्रपटांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलेल पाहायला मिळाले आहे.



