लोकप्रिय मराठी अभिनेत्री नेहा गद्रे लवकरच आई होणार आहे. स्टार प्रवाहच्या गाजलेल्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेतून ती घराघरांत पोहोचली. नेहा लवकरच आई होणार असून तिच्या प्रेग्नन्सीसंदर्भात ती विविध पोस्ट शेअर करत असते. अभिनेत्री सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहे. नेहाने ऑस्ट्रेलियातील टंगलूमा बीचवर फोटोशूट करत आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. तिच्या या गोड बातमीवर चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन केलं होतं. अशातच नुकतंच अभिनेत्रीचं डोहाळ जेवण पार पडलं. (Sukanya Mone went Neha Gadre baby shower)
आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केल्यानंतर नेहाचं डोहाळजेवण पार पडलं आहे आणि या डोहाळ जेवणाच्या सोहळ्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. लग्नानंतर अभिनय सोडून नेहा नवऱ्याबरोबर कायमची ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली. हिरव्या रंगाची काठापदराची साडी, सुंदर दागदागिने या लूकमध्ये नेहा खूप सुंदर दिसली. तर तिच्या नवऱ्याने पांढऱ्या रंदाचा कुर्ता पायजमा घातला असून त्याच्या कुर्त्यावर मोराचे सुंदर चित्र रेखाटलं असल्याचं पाहायला मिळालं.
आणखी वाचा – ‘पुष्पा २’ चेंगराचेंगरी प्रकरणातील जखमी मुलगा अजूनही व्हेंटिलेटवर, प्रकृती चिंताजनक, मेंदूला गंभीर इजा
नेहाच्या या डोहाळजेवणाला अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही हजेरी लावली होती आणि याबद्दल नेहाने सुकन्या यांचे आभार मानले आहेत. नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे सुकन्या मोने यांच्याबबरोबरचे फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. “माझ्या या आनंदाच्या क्षणी तुम्ही सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद” असं म्हणत नेहाने सुकन्या यांचे आभार मानले आहेत. तर सुकन्या यांनीही नेहाच्या फोटोवर कमेंट करत “मलाही मज्जा आली, ऑस्ट्रेलियाला येऊन मला तुझं डोहाळे जेवण करता आलं”.
आणखी वाचा – आजारपणामुळे अमोलचे गंभीर हाल, चालताही येईना अन्…; अवस्था बघून सर्वांनाच दु:ख अनावर
दरम्यान, नेहाने शेअर केलेल्या या फोटोला अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. ५ वर्षांपूर्वी नेहाने ईशानबरोबर लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियातच स्थायिक झाली. अभिनय क्षेत्र सोडून नेहा ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहे. याशिवाय तिने डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन अँड केअर यामध्ये पदवी मिळवली आहे.