शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मागितली होती सोनाली कुलकर्णीची माफी, अभिनेत्रीने स्वत:च सांगितले कारण, म्हणाली, “मला त्रास…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 2, 2024 | 10:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Sonalee Kulkarni told director apologized

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मागितली होती सोनाली कुलकर्णीची माफी, अभिनेत्रीने स्वत:च सांगितले कारण, म्हणाली, “मला त्रास...”

मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. ‘अप्सरा’ म्हणून सोनालीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांवर आपलं अधिराज्य गाजवलं आहे. निरागस अभिनय, उत्तम नृत्यकौशल्य व मनमोहक सौंदर्याने सोनालीने मराठीसह हिंदी प्रेक्षकांनादेखील भुरळ घातली आहे. मराठी व त्यानंतर बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर सोनाली नुकतीच दाक्षिणात्य चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनालीने मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यात सोनालीने सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला एक महिना फक्त गर्दीत उभे करण्यात आले होते आणि याच कारणामुळे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिची माफी मागितली होती. याबद्दल स्वत: अभिनेत्रीने ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखातीच्या कार्यक्रमात भाष्य केले.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

आणखी वाचा – रविवारी शुभ योग व सूर्यदेवाच्या कृपेमुळे ‘धनु’ राशीसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या..

यावेळी सोनाली असं म्हणाली की, “चित्रपटाच्या टीमकडून दिग्दर्शक हा अगदी उस्फूर्त असल्याचे मला सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी काहीही सुचू शकेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण मी पूर्ण एक महिना तयार होऊन फक्त गर्दीमध्ये उभी राहायचे. मी जेव्हा जैसलमेरला गेले तेव्हा माझ्या गाण्यापासून माझे शूटिंग सुरू होणार होते आणि तेव्हा तिथे प्रचंड थंडी होती. त्यामुळे मोहनलाल सरांची तब्येत बिघडली. तसेच अ‍ॅक्शन सीन्स १२ दिवसांत संपणार होते ते संपायला २४ दिवस लागले. त्यामुळे त्यांनी नंतर मला असं सांगितलं की, आता आपण तुझ्या गाण्याचे शूटिंग नंतर करु”.

आणखी वाचा – वधानंतरही विरोचक पुन्हा जीवंत, देवीआईच्या लेकींवर हल्ला करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नवीन शक्ती बहाल?

यापुढे ती असं म्हणाली की, “त्यामुळे मी त्या अ‍ॅक्शन सीन्समध्ये जॉइन झाले आणि त्यात आम्ही फक्त बघत होतो. पण बघणार तरी किती?. तरीही पूर्ण मेकअप करुन मी उभी राहायचे. तेव्हा गंमतीत मला माझा दिग्दर्शक “मला मला माफ कर. तुला असं कधीच कुणी वागवलं नसेल. एक महिना तू फक्त गर्दीमध्ये उभी होतीस” असं म्हणाला. मला त्रास या गोष्टीचा होता की, सर्वांना त्या चित्रपटाविषयी काहीतरी माहीत होतं. प्रत्येकाने एकेक सीन केले होते. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या त्या चित्रपटात होते. पण मला त्या चित्रपटाबद्दल काहीच माहीत नव्हतं. कारण मी एकही सीन शूट केला नव्हता”.       

Tags: Malayalam Directormarathi actressmarathi entertainment newssonalee kulkarni
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Sushant Singh Rajput's fourth death anniversary before his sister Shweta Singh went to Kedarnath in memory of her brother.

सुशांत सिंहच्या मृत्यूच्या चौकशीबाबत बहिणीचं थेट केदारनाथकडे साकडं, साधूंना भेटली, ध्यानधारणाही केली, म्हणाली, “देवाच्या कृपेने...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.