शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारंपरिकला मॉडर्न टच, राजेशाही थाट अन्…; प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्यातील रॉयल लूकची चर्चा, डिझाइनर साडीत खुललं सौंदर्य

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 8, 2025 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Prajakta Gaikwad Engagement Look

पारंपरिकला मॉडर्न टच, राजेशाही थाट अन्…; प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्यातील रॉयल लूकची चर्चा, डिझाइनर साडीत खुललं सौंदर्य

Prajakta Gaikwad Engagement Look : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने काही दिवसांपूर्वीच लग्न ठरल्याचं जाहीर केलं होतं. सोशल मीडियावर “ठरलं! कुंकवाचा कार्यक्रम” अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या सगळ्या चाहत्यांना गूडन्यूज दिली होती. त्यानंतर अभिनेत्रीच्या घरी तिच्या साखरपुड्याची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळालं. तेव्हापासून अभिनेत्री केव्हा लग्न करणार, तिचा होणारा जोडीदार कोण आहे याबाबत चर्चा रंगून राहिली होते. अखेर अभिनेत्रीने साखरपुडा समारंभ उरकत तिच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक सोशल मीडियाद्वारे दाखवली आहे.

प्राजक्ताने अगदी शाही थाटामाटात साखरपुडा समारंभ केला. अभिनेत्रीच्या या शाही सोहळ्याने अनेकांचे डोळे सुखावले. प्राजक्ताच्या या आनंदाच्या बातमीनंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. अगदी नाचत गाजत प्राजक्ताची एंट्री या साखरपुडा असलेल्या मंडपात झालेलीही पाहायला मिळाली. अभिनेत्रीच्या पारंपरिक अंदाजात साखरपुड्याचे विधी उरकले तर वेस्टर्न आऊटफिट परिधान करत त्यांनी एकमेकांना अंगठी घातली.

आणखी वाचा – प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न, नवऱ्याचा फोटोही समोर, नावाच्या बाबतीत जुळून आला योगायोग

View this post on Instagram

A post shared by Jiza Jewellery Studio™ | जिजा ज्वेलरी स्टुडिओ (@jizajewellerystudio)

प्राजक्ताच्या साखरपुड्याची लक्षवेधी बाब म्हणजे त्यांचा रॉयल लूक. साखरपुड्यासाठी प्राजक्ताने ऑफ व्हाईट रंगाची डिझाइनर साडी नेसली होती आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. त्या ब्लाऊजवर असलेल्या सुंदर अशा नक्षीकामाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताच्या ब्लाउजच्या मागे ‘शंभूराज’ असं नाव लिहिलेलं पाहायला मिळालं. तर तिचा होणारा जोडीदार पांढऱ्या रंगाच्या जोधपुरी सूटमध्ये असून त्याच्या कोटवर ‘प्राजक्ता’ असं लिहिलं होतं. त्यांच्या या वेषभूषेतून परस्परांवरील प्रेम स्पष्टपणे व्यक्त होत आहे.

आणखी वाचा – गरोदर असताना मुद्दाम टाईट कपडे घालायला सांगितले आणि…; निर्मात्याबाबत राधिका आपटेचे खळबळजनक आरोप, हॉलिवूड-बॉलिवूड इंडस्ट्रीची केली तुलना

View this post on Instagram

A post shared by Jiza Jewellery Studio™ | जिजा ज्वेलरी स्टुडिओ (@jizajewellerystudio)

‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’, ‘आई माझी काळुबाई’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्राजक्तानं आपली वेगळी ओळख निर्माण केली. अभिनय क्षेत्रात ती नेहमीच चमकदार कामगिरी करत आली आहे. आता ती वैयक्तिक आयुष्यातही एका नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत तिने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची म्हणजेच महाराणी येसू बाईंची भूमिका केली होती. आता प्राजक्ताच्या नवऱ्याच्या बाबत सुद्धा एक खास योगायोग जुळून आला आहे. प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीचं नावही ‘शंभूराज’ असं आहे.

Tags: marathi actressprajakta gaikwadprajakta gaikwad engagement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
maharashtrachi hasiyajatra fame actor video

Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पहिल्यांदाच कोकणात घेतोय भातशेतीचा आनंद, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, "चिखलात काम करुन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.