गुरूवार, मे 29, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये”, दिग्गज अभिनेत्याने अश्लील मॅसेज केल्याचे प्राची पिसाटचे गंभीर आरोप, बाजू घेणाऱ्यांनाही सुनावलं

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 26, 2025 | 10:55 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prachi Pisat Has Accused Sudesh Mhashilkar

"तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये", दिग्गज अभिनेत्याने अश्लील मॅसेज केल्याचे प्राची पिसाटचे गंभीर आरोप, बाजू घेणाऱ्यांनाही सुनावलं

मराठमोळी अभिनेत्री प्राची पिसाट सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, अभिनेत्री तिच्या मोहक अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असते. अशातच प्राचीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. प्राचीने एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या अश्लील मॅसेजचा थेट स्क्रीनशॉट शेअर करत त्याला जाब विचारला आहे. मराठमोळ्या अभिनेत्याबाबतची ही पोस्ट पाहून सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे. मराठमोळ्या अभिनेत्याच्या अकाउंटवरुन आलेला हा मॅसेज नेमका त्यांनीच केला आहे का?, की त्यांचं अकाउंट हॅक झालं आहे याबाबत खुलासा होणं अद्याप बाकी आहे. प्राची पिसाटने ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्या मॅसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांच्यावर आरोप केले आहेत. (Prachi Pisat Has Accused Sudesh Mhashilkar)

‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेमध्ये सध्या सुदेश म्हशीलकर काम करत आहेत. दरम्यान, प्राचीने त्यांच्यावर अश्लील मॅसेज केल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्राचीने शेअर केलेल्या या स्क्रीनशॉटमध्ये असं दिसून येतंय की, “तुझा नंबर पाठव ना… तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये… कसली गोड दिसतेस” असा मॅसेज सुदेश यांनी प्राचीला केला आहे. प्राचीने हा स्क्रीन शॉट शेअर करत, “आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली. बायकोचा नंबर असलेच. ती ही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का?, ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरी नंबर मिळवशील आणि कॉल करशीलच”, असं लिहिलं आहे.

आणखी वाचा – हगवणे कुटुंबियांचा कोणाच्या जीवावर एवढा माज?, नक्की पैसे कमवण्यासाठी करतात तरी काय?, सूनांना सांभाळू शकले नाहीत अन्…

View this post on Instagram

A post shared by Prachi Pisat (@prachipisat11.11)

मात्र, सुदेश यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी विश्वास दाखवला आहे आणि त्यांचं अकाउंट हॅक झालं असावं असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने प्राचीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं आहे की, “काही लोक यांना खूप वर्षांपासून ओळखतात आणि एवढी १००% खात्री ही आहे की हे नसतील, तू पोलिसात तक्रार दाखल कर, ते सांगतील हॅकर होता की ते स्वतः आहेत”, नेटकऱ्याच्या या कमेंटवर यावर प्राचीने रिप्लाय केलाय की, “मला कोणाला त्रास नाही द्यायचा. मला फक्त दोनदा शांतपणे इग्नोर केल्यानंतर एका मॅच्युअर माणसाला कळलं नाही म्हणून माझ्या पद्धतीने मॅसेज येणं बंद करायचं होतं”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “बऱ्याच कलाकारांना मोठं केलं, पण मला काम दिलं नाही”, केदार शिंदेंच्या मावशी चारुशीला साबळेंचा खुलासा, काम देण्याचं वचन देऊन…

अभिनेते राजेश देशपांडे यांनी प्राचीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, “हे सुदेशने केलेलं नाहीये. तो फेसबुकवर अनेक दिवस लॉगइन नाही आहे आणि तो असा माणूस नाही आहे. काहीतरी गफलत आहे”. त्यावर प्राचीने रिप्लाय करत लिहिलं की, “त्यानेच मेसेज केलाय असं त्यांनी अनेकांना सांगितलंय”. पुढे प्राचीने आणखी एक स्टोरी पोस्ट करत लिहिलं की, “हो असू शकतं. बाय द वे हॅकर मराठी होता आणि अनेक महिने मुलींना मॅसेज करत असेल. बरं झालं माझ्या निमित्ताने कळलं तरी असे मॅसेज करतोय आणि हो, हुशार पण होता. लगेच अनफ्रेंड केलं हॅकरने”, असं म्हणत प्राचीने सुदेश यांच्या मॅसेजचा आणखी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये सुदेश यांनी लिहिलं आहे की, “खूपच सेक्सी दिसायला लागलीयेस हल्ली…वाह”. सध्या हे प्रकरण चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे.

Tags: marathi actressmarathi industryviral post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vaishnavi hagawane death case
Social

“माझी मुलगी तर गेली…”, भरल्या डोळ्यांनी हात जोडत वैष्णवीच्या वडिलांची विनंती, म्हणाले, “एखाद्या लेकराबाबत असं…”

मे 29, 2025 | 5:56 pm
Rohan Pednekar On Television Industry
Entertainment

“मराठी बोलता, वाचता येत नाही…”, लोकप्रिय अभिनेत्याकडून टेलिव्हिजन विश्वातील सत्य परिस्थिती समोर, म्हणाला, ” उगाचच डोक्यावर…”

मे 29, 2025 | 5:25 pm
Bharti Singh Health
Entertainment

भारती सिंहची तब्येत बिघडली, रक्त तपासणी करताना घाबरली अन्…; नेटकरी म्हणाले, “करोना तर…”

मे 29, 2025 | 4:00 pm
Vaishnavi hagawane death case
Social

“संशय होता तर लग्न का केलं?”, वैष्णवी हगवणेवर केलेल्या आरोपांवर कस्पटे कुटुंबियांचा सवाल, पैशांसाठी लग्न करुन…

मे 29, 2025 | 2:05 pm
Next Post
Ambat Shaukin Movie  Trailer

प्रेम, मैत्री, मानसिक गुंतागुंत अन्…; ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचा ट्रेलर समोर, अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी, लवकरच होणार प्रदर्शित

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.