रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुजलेले डोळे, चेहऱ्यावर जखमा आणि…; चिन्मयी सुमितच्या गाडीचा अपघात, खंत व्यक्त करत मराठी बांधवांना आवाहनही केलं…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 30, 2025 | 10:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
chinmayee Sumeet car accident

सुजलेले डोळे, चेहऱ्यावर जखमा आणि…; चिन्मयी सुमितच्या गाडीचा अपघात, खंत व्यक्त करत मराठी बांधवांना आवाहनही केलं…

chinmayee Sumeet car accident : महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अभ्यासक्रमात यावी या राज्य सरकारच्या निर्णयावरुन वाद सुरु झाला. सरकारने हिंदी शिकवणे अनिवार्य म्हटलं आणि हा वाद पेटून उठला. दरम्यान, जनतेने केलेल्या विरोधानंतर हा अनिवार्य शब्द हटविण्यात आला. अनेक स्तरातून हिंदी भाषा नको याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. अनेकांनी या निर्णयाला ठाम विरोध केला आहे. हिंदी सक्तीबद्दल मराठी कलाक्षेत्रातूनही अनेक कलाकार मंडळी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीवर अनेक कलाकारांनी स्पष्ट भूमिका व्यक्त केल्या आहेत.

या प्रकरणावरुन पहिल्यांदाच मनसे आणि ठाकरेगट एकत्र येत आंदोलन करत आहेत. काँग्रेसचाही या आंदोलनाला पाठिंबा आहे. या आंदोलनात राज्यातील नागरिकांसह अनेक सेलिब्रिटी मंडळीही सहभागी झाले आहेत. अशातच अभिनेत्री चिन्मयी सुमितने व्हिडीओ शेअर करत या आंदोलनाला पाठिंबा दिला असून यावेळी तिला उपस्थित राहता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार चिन्मयी यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला होता, मात्र हा व्हिडीओ आता त्यांच्या फीडवररुन काढण्यात आला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी त्यांचा अपघात झाला असल्याचं सांगितलं.

आणखी वाचा – तीन मजली बंगला, स्विमिंगपूल आणि…; फराह खानचा कुक दिलीपचं गावी आहे टोलेजंग घर, पाहताच बसेल धक्का

चिन्मयी यांनी व्हिडीओ शेअर करत अपघाताची बातमी दिली आणि याचबरोबर या आंदोलनात सहभागी होऊ शकत नसल्याची खंतही व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, “नमस्कार मी चिन्मयी सुमीत, आज २९ जून. आपण गेले काही दिवस तिसरी भाषा हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करत आहोत. गेले अडीच महिने आम्ही रान पेटवलंय आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज आंदोलनाचा पहिला टप्पा कृतिशील हस्तक्षेपाचा जिथे आपण ही अन्यायकारक परिपत्रक आणि आदेशांची होळी करणार आहोत. पत्रकार भवन गिरगाव येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दोन दिवसांपूर्वी माझा एक अपघात घडला, त्यामुळे तिथे उपस्थित राहण्यासाठी डॉक्टरांनी मला परवानगी दिलेली नाही”.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’च्या बापुजींच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?, लूकमध्ये अभिनेत्रींनाही देते टक्कर, त्यांची जुळी मुलंही…

पुढे त्यांनी म्हटलं की, “मी तिथे जरी शरीराने नसली तरी तमाम मराठीजनांना मी आवाहन करते की या आंदोलनात आपली संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात दिसू द्या. पहिल्यांदा असं होतंय जेव्हा राजकीय पक्ष आणि नागरीक समजा कोणत्या तरी एका विषयावर एकत्र येऊन आदोलन उभं करत आहेत. त्या सर्व राजकीय पक्षांना माझे मनापासून धन्यवाद. मी आज तिथे उपस्थित राहू शकत नाही याबद्दल मला खूप मोठी खंत वाटते, पण मला विश्वास आहे की तुम्ही सर्व मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहाल आणि ते आंदोलन कराल. आपण एकत्र आलो आहोत. एकत्र संघर्ष करुयात, विजयी होऊया. जय भीम, जय हिंद आणि जय महाराष्ट्र. जय मराठा”.

Tags: car accidentChinmayee Sumeetmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Shefali Jariwala Passed Away

शेफालीच्या अस्थी हृदयाशी धरुन ढसाढसा रडला पराग त्यागी, बायकोचं नसणं सहन होईना, व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.