बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लक्ष्या केवळ उत्तम कलाकारच नाही तर…”, अश्विनी भावेंनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलची खास आठवण, म्हणाल्या, “सेटवर असला की…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 22, 2024 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Ashwini Bhave shared her momory with late actor Laxmikant Berde and said that he is gone too soon.

"लक्ष्या केवळ उत्तम कलाकारच नाही तर...", अश्विनी भावेंनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलची खास आठवण, म्हणाल्या, "सेटवर असला की..."

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आजही येते. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीदेखील त्यांची आठवण काढत असतात. अनेक कलाकार मंडळी लक्ष्मीकांत बेर्डेंविषयीची आठवण काढत त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से व आठवणी सांगत असतात. अशातच अश्विनी भावे यांनीही नुकतीच लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलची एक आठवण सांगितली असून ते खूप लवकर गेले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अश्विनी भावे यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली.

यावेळी अश्विनी भावे यांना काही जून फोटो दाखवण्यात आले. यात त्यांना लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो दाखवण्यात आला. तेव्हा त्यांच्याविषयी बोलताना अश्विनी भावे असं म्हणाल्या की, “लक्ष्या हा असा एक कलाकार आहे जो केवळ उत्तम कलाकारच नाही तर एक सहृदयी माणूसही होता. त्याने कधीच कुणाचं उणधुणं काढलं नाही. म्हणजे मी तरी ऐकलं नाही आणि त्याने कधीही सेटवरचं वातावरण तंग होऊ दिलं नाही”.

आणखी वाचा – “मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हार स्वीकारताना…”, प्रसाद ओकने शेअर केलेली खास पोस्ट चर्चेत, म्हणाला, “दिघे साहेबांच्या…”

यापुढे त्या असं म्हणाल्या की, “आमच्या क्षेत्रात असे खूप प्रसंग येतात. जिथे कायम टेंशनच असतं. एका तणावाखालीच सगळेजण काम करत असतात. त्यावेळी लक्ष्मीकांतसारखा माणूस सेटवर असला तर कायम सकारात्मकता असयाची. तो खरंच खूप उत्तम अभिनेता व उत्तम माणूस होता. पण तो खूप लवकर गेला”. तसेच या मुलाखतीत त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.   

आणखी वाचा – आईवर मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर अमृता खानविलकरची भावुक पोस्ट, म्हणाली, “गेले दोन महिने माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी…”

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय व सौंदर्याने अश्विनी भावे यांनी ८०-९०चा काळ गाजवला. ‘शाब्बास सूनबाई’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘वजीर’ ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘ध्यानीमनी’सारख्या अनेक मराठी व ‘जखमी दिल’, ‘मोहब्बत की आरजू’, ‘बंधन’सारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अश्विनी व दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही अनेक एकत्र चित्रपट केले. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’सारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

Tags: ashwini bhavelaxmikant berdemarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Aishwarya Narkar Angry On Netizens

"नारकरांचे अचरट हावभाव आणि…", नवऱ्याच्या डान्सवरुन बोलणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं, म्हणाल्या, "लाज वाटायला हवी की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.