बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर अनंतात विलीन, तेजस्विनीने पार पाडलं लेकीचं कर्तव्य, शेवटचं पाहताना सगळेच ढसाढसा रडू लागले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 17, 2025 | 1:04 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
jyoti chandekar death

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर अनंतात विलीन, तेजस्विनीने पार पाडलं लेकीचं कर्तव्य, शेवटचं पाहताना सगळेच ढसाढसा रडू लागले अन्…

jyoti chandekar death : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे १६ ऑगस्ट २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील नवी पेठ वैंकुठ स्मशानभूमी याठिकाणी 12 वाजून 5 मिनिटांनी विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. आज १७ ऑगस्ट रोजी ज्योती चांदेकर अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या अंत्यसंस्काराला कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती लावलेली दिसली. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांनाही खूप मोठा धक्का बसला आहे.

ज्योती यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. श्रेया बुगडे, अभिनेता धैर्य घोलप पूर्णवेळ तेजस्विनीबरोबर दिसून आले. तर सुचित्रा बांदेकर, श्रुती मराठे आणि ‘ठरलं तर मग’मध्ये त्यांच्या नातसुनेची म्हणजेच सायलीची भूमिका साकारणारी जुई गडकरीदेखील उपस्थित होती, यावेळी ती अक्षरश: ओक्साबोक्शी रडत होती. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने याबाबतची माहिती दिली. सध्या ज्योती ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करत होत्या. त्यांच्या पूर्णा आजी या पात्रावर प्रेक्षक अगदी खऱ्याखुऱ्या आजीप्रमाणे प्रेम करायचे. तसेच मालिकेतील सहकलाकारांसहही त्या जोडल्या गेल्या होत्या. काल दुपारी ४च्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. आतापर्यंत ज्योती यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केलं आहे. गेली अनेक वर्ष त्या मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’च्या सेटवरच बेशुद्ध पडलेल्या आणि…; गेल्यावर्षी आजारपणानंतर केलेलं मालिकेत कमबॅक, आता मात्र आजारपणाशी झुंज अपयशी

ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितच्या आई आहेत. आईच्या निधनाची बातमी तेजस्विनी पंडितने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे दिली. ‘आई…’ असे म्हणत तिचे दु:ख व्यक्त केले. तिने पूर्णा आजींचा एक फोटो शेअर करत असे लिहिले की, “नमस्कार, कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आहे तसेच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर पंडित यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी आज १६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे. त्यांचे अंत्यसंस्कार उद्या, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी, पुढे येथे होणार आहेत. शोकाकुल: तेजस्विनी पंडित, पोर्णिमा पंडित व संपूर्ण चांदेकर-पंडित कुटुंब”.

आणखी वाचा – “तू फसवलंस…”, पूर्णा आजीच्या निधनाने सायलीला धक्का, तर अर्जुनलाही अश्रू अनावर, म्हणाला, “आमच्यात नाहीस…”

ज्योती चांदेकर यांनी आजवर ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag ) या मालिकेद्वारे त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत होत्या. अशातच आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
shriram nene knee health Tips

तरुण वयात गुडघे दुखतायत?, डॉ. श्रीराम नेनेंच्या 'या' खास टिप्स करतील गुडघेदुखीपासून सुटका, वजन कमी…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.