मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेतून अक्षयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेत अक्षयाने साकारलेली हळवी तितकीच खंबीर अशी लतिका ही भूमिका प्रेक्षकांना फार आवडली. मालिकेतील अक्षयाची भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेताच अक्षयाने रंगभूमीवर एन्ट्री केली आहे. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकात ती मुख्य भूमिकेत आहे. (Akshaya Naik On Atal Setu Bridge)
अभिनेत्री म्हणून काम करत असताना अक्षयाला बरेचदा ट्रोलिंगचा सामना हा करावा लागला. बरेचदा अभिनेत्रीला बॉडी शेमिंगवरुनही ट्रोलही करण्यात आलं. दरम्यान अक्षया अनेकदा तिला न पटणाऱ्या गोष्टींवर बेधडकपणे भाष्य करताना दिसली. अक्षया सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
आणखी वाचा – आधी घरगुती पद्धतीने केलं बारसं; आता सांगितलं लेकीचं नाव, हटके आणि अर्थही आहे खूपच खास
अक्षयाने नुकतीच अटल सेतू ब्रिजवरुन एक खास पोस्ट शेअर केली आहे. “आपल्या मुंबईला आपण स्वप्नांची नगरी असं म्हणतो. पण त्या स्वप्नांच्यामध्ये येणारा एक अडथळा म्हणजे ट्राफिक. नवी मुंबई ते मुंबईचा प्रवास करायला दोन तास लागतात. पण या समस्येवर आपले कृतिशील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मात केली आहे. गेली ५० वर्ष जी गोष्ट केवळ कागदावर होती ती गोष्ट त्यांनी सत्यात आणली आहे. अटल सेतूला त्यांनी सत्यात आणलं आहे. हा प्रवास आता १५ ते २० मिनिटात होणार आहे. २४ डिसेंबर २०१६ ला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी भूमिपूजन केलं, तर १२ जानेवारी २०२४ ला या अटल सेतूच लोकार्पण झालं आहे” असं म्हणत अभिनेत्रीने तुम्ही पाहिला की नाही अटल सेतू? असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.

अक्षयाच्या या पोस्टवर “ताई २५० रुपये टोल आहे, त्याच काय सर्वसामान्य लोकांना परवडेल का?” अशी कमेंट एकाने केली आहे. या पोस्टवर अभिनेत्रीने उत्तर देत, “दोन तास टॅक्सीमध्ये वेळ घालवणार त्याचा मीटर नक्कीच वाढणार. तिथे वाचतात की. शिवाय स्वतःची गाडी असल्यास इंधन वाचणार, अर्थात त्याचे पैसे वाचणार. त्याहून अधिक तुमचा वेळ अजून वाचतो” असं म्हणत नेटकऱ्याला अटल सेतूच महत्त्व पटवून दिलं आहे.