दिवाळी हा सण भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा सण आहे. या सणाची अनेकजण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळीच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येतात. नुकताच दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. दिवाळीनिमित्त अनेक जण एकमेकांना भेटवस्तू देतात. दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. ही परंपरा एका मराठी अभिनेत्रीने कायम राखली आहे आणि या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यंदाच्या दिवाळीत त्यांनी याच मालिकेतील काहींना भेटवस्तू दिल्या. (Aishwarya Narkar Give Gifts)
ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे त्या त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच पती व अभिनेते अविनाश नारकरांबरोबरचे अनेक रील व्हिडीओही शेअर करत असतात. त्यांच्या या व्हिडीओला प्रेक्षक व चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच त्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने यंदाच्या दिवाळी मालिकेतील सहकारी अभिनेत्रींना भेटवस्तू म्हणून ड्रेस दिले आणि याची खास झलक त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे
दिवाळीनिमित्त ऐश्वर्या नारकरांनी तितीक्षा तावडे, अमृता रावराणे, एकता डांगर यांसह मालिकेच्या इतर टीमलादेखील दिवाळीनिमित्त भेट म्हणून ड्रेसेस दिले आहेत. ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत खास भेटवस्तू देत आहेत. तसंच त्यांनी दिलेल्या भेटवस्तू मिळताच अभिनेत्रींनीही आपला आनंद व्यक्त केला आहे. गिफ्ट्स म्हणजेच आनंद असं लिहत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “माझ्या प्रियकरांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू” असं म्हटलं आहे. ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
तसंच या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये अनेकांनी ऐश्वर्या नारकरांच्या या कृतीचे कौतुकही केलं आहे. “तुम्ही सर्व चांगले काम करत आहात”, “देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो”, “खूपच सुंदर”, “खूप छान”, अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी ऐश्वर्या नारकरांचे कौतुक केलं आहे. दरम्यान, ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल बोलायचे झालं तर अभिनेत्री सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि या मालिकेत त्या सध्या मैथिली ही भूमिका साकारत आहेत. मालिकेने लीप घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल करण्यात आला आहे. याआधी त्या विरोचक या खालनायिकेची भूमिकेत होत्या.