मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही वर्षांत मुंबईत स्वत:चं घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. पृथ्वीक प्रताप, रुचिरा जाधव, प्रसाद ओक, मंगेश देसाई, अश्विनी महांगडे, गिरीजा प्रभू, मयुरी वाघ या कलाकारांनी नवीन घर खरेदी करत अलीकडेच आपलं स्वप्न पूर्ण केलं. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ते म्हणजे अदिती द्रविड.
मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री अदिती द्रविडने मुंबईत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं आहे. याची खास पोस्ट आणि आपल्या घराची पहिली झलक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. पहिल्या फोटोमध्ये गृहप्रवेश पूजन तर, तिने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या नव्या घराचा खोली क्रमांक ८०१ असल्याचं पाहायला मिळत आहे.
अशातच अदितीने तिच्या नवीन घराच्या नवीन गृहप्रवेशाचे काही खास क्षण शेअर केले आहेत. यावेळी तिने घरात गोवऱ्यांची छोटीशी चूल मांडलेलीही पाहायला मिळत आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये अदिती गृहप्रवेश करतानाचे पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये तिने तिच्या घरच्या पूजाचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. अदितीने शेअर केलेल्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी तिला पुन्हा एकदा तिच्या नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अदिती द्रविडने अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तिच्या चाहत्यांना नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी दिली होती. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अदितीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांना दिली आहे. “शेवटी मी मुंबईला हो म्हटले. माझं स्वत:चं घर, स्वप्नपूर्ती!” असं कॅप्शन अदितीने तिच्या घराचे काही फोटो शेअर केले होते.