चित्रपट, नाटक, मालिकांमधील विविध भूमिका कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहणं हे फार कमी कलाकारांच्या नशिबी येतं. एखाद्या भूमिकेमुळे कलाकाराला ओळखणं मिळणं म्हणजे उत्तम कामाची पोचपावती. मराठीतील असे कित्येक जुने कलाकार बऱ्याच दशकांचा काळ लोटला तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते चेतन दळवी. चेतन यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘हमाल दे धमाल’, ‘माहेरचा आहेर’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘एक फुल चार हाफ’, ‘माझा पती करोडपती’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पण गेल्या काही काळापासून ते फारसे कुठेच दिसले नाहीत. आता तर चेतन यांचा लूकही पूर्ण बदलला आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आजारपण, त्यांचं काम, इंडस्ट्रीचा नसलेला पाठिंबा याबाबत खुलेपणाने सांगितलं. (Marathi actor chetan dalvi journey)
ब्रेनस्ट्रोक आला अन्…
चेतन दळवी यांनी इट्स मज्जाच्या ‘ठाकुर विचारणार’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या संपूर्ण प्रवासाबाबत भाष्य केलं. चेतन त्यांच्या आजारपणाविषयी म्हणाले, “२०१९नंतर मला ब्रेनस्ट्रोक आला. त्यानंतर माझं काम कमीच झालं. इंडस्ट्रीतील काही लोक फोन करतात. काही लोकांच्या फोन लक्षातच नाही. अमुक-अमुक तुला विचारतात असं मला कोणतरी फोनवर बोलतं. मग मी म्हणतो, हो तो विचारत होता का?. बस्स एवढंच. पण याचं मला काही वाईट वाटत नाही”.
आणखी वाचा – सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल
इंडस्ट्रीला विसर
“अरे हा मला कसा काय विसरला? हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा वाईट वाटू शकतं. समोरचा माणूस आपल्याला विसरणारच आहे हे माहित असताना वाईट का वाटेल?. इंडस्ट्रीत व्यावसायिकता आली आहे असं म्हणण्यापेक्षा लोक अधिक प्रगत होत चालले आहेत. अरे सध्या अमूक-अमूक माणूस नाहीये असं कोणतरी बोलतं. मग समोरचा बोलतो हो का नाही आहे का? मग नाही आहे तर नसूदेत. असं म्हणून बाजूला करतात. असं करुनच तुमचा पत्ता कट केला जातो. मला ब्रेनस्ट्रोक झाल्यानंतर हे सगळं जाणवू लागलं. त्याचं मला काही वाटतही नाही”.
“‘माहेरचा आहेर’ चित्रपटाने त्या काळात आठ कोटी कमावले. ‘माहेरची साडी’ चित्रपटानंतर हा चित्रपट चालला. ‘माहेरचा आहेर’ चित्रपटाचा मला नंतर फायदा झाला. पण तसं बघायला गेलं तर फायदा झालाही नाही. . चित्रपटानंतर मला चित्रपट मिळत गेले. पण जसे चित्रपट मिळायला हवे तसे मिळाले नाहीत. काय काय कलाकारांना सलग चित्रपट मिळत जातात. पण माझ्याबाबत तसं काही झालं नाही. काही कलाकारांचं एक चित्रपटानंतर मीटर पडतं. पण मला मध्ये मध्ये सिग्नल लागत गेले”. चेतन दळवी यांचा संपूर्ण प्रवास खरंच कौतुकास्पद आहे.