मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मित्रांनी हिंदू धर्मद्रोही म्हटलं आणि…”, विद्याधर जोशींनी सांगितला ‘तो’ कटू अनुभव, म्हणाले, “यांच्यासारख्यांना कापलं पाहिजे आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 27, 2023 | 12:46 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vidyadhar Joshi Post

"मित्रांनी हिंदू धर्मद्रोही म्हटलं आणि...", विद्याधर जोशींनी सांगितला 'तो' कटू अनुभव, म्हणाले, "यांच्यासारख्यांना कापलं पाहिजे आणि..."

नाटक, मालिका व चित्रपट या तीनही क्षेत्रात सक्रिय असणारे अभिनेते म्हणजे विद्याधर जोशी उर्फ बाप्पा. आजवर त्यांनी त्याच्या खलनायकाच्या भूमिकेतून तसेच एखादवेळेस वडिलांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. इतकंच नव्हे तर ‘बिग बॉस’ मराठी मध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून घेतलेला सहभाग हा एखाद्या तरुण स्पर्धकाला लाजवेल असा होता. विद्याधर जोशी हे सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. अशातच त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरुन वैयक्तिक आयुष्यातील एक अनुभव शेअर केला आहे. (Vidyadhar Joshi Post)

विद्याधर जोशी यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “गेली दोन-तीन वर्ष तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करायची होती ती आज दत्त जयंतीच्या निमित्ताने करतो. मी राहतो त्याच्या पलिकडे दोन गल्ल्या सोडून एका ठिकाणी दरवर्षी २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट, शिवजयंती (वर्षातून दोनदा), दत्त जयंती, हनुमान जयंती, कृष्णजन्म, राम जन्म (हा अलीकडे जोरात) आणि इतरही काही दिवशी सत्यनारायणाची महापूजा होते. लाऊडस्पीकरवरुन मुलायम आवाजात मोठ्यांने पूजा सांगितली जाते. त्याचा मला पूर्वीपासून त्रास व्हायचा. तो मी बोलूनही दाखवायचो पण गेली काही वर्ष तो बोलून दाखवला तर माझे मित्र माझ्याकडे हिंदू धर्मद्रोही व पर्यायाने इतर प्रकारचा द्रोही या नजरेने बघायला लागले आणि आधी ‘याच्यासारख्यांना कापलं पाहिजे’ असं काहीसं म्हणायला लागले” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा – जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ चा टीआरपी घसरला, ‘या’ मालिकेला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती आणि…

यापुढे त्यांनी लिहिलं आहे की, “त्यानंतर मी अशी कल्पना काढली की, गेली दोन-तीन वर्ष मी याच दिवशी माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायला लागलो. सार्वजनिक पूजेच्या तिकडचा भट (भटजी, गुरुजी) याच्या पूजा सांगण्यावरुनच मी माझ्या घरी पूजा करायला लागलो. मुलाला ते पूजा सांगणारे कधी येत आहेत याच्यावर नजर ठेवायला सांगितली आणि ते आले की तो मला लगेच फोन करतो. ती पूजा त्यांच्या लाऊडस्पीकरवरुन येणाऱ्या सूचना बहुकूम पूजा करुन घेतो” असंही म्हटलं.

आणखी वाचा – गौतमीच्या लग्नानंतर बहीण मृण्मयी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “अजूनही विश्वास बसत नाही…”

यापुढे ते, “हल्ली माझ्याबद्दलचा आदर समाजात वाढलेला दिसतो. यावर्षी मला चौथीपर्यंतच्या मुलांच्या घेतलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरक म्हणून बोलावंल आहे. (वाचलेले दक्षिणेचे पैसे साठवून निदान पूजा सांगणाऱ्यांकरता योग्य प्रकारे आरत्या म्हणण्याचे आणि लाऊडस्पीकर चालवणाऱ्यांकरता साऊंड इंजिनिअरिंगचे वर्ग सुरु करावेत असं मनात आहे त्याची एक शाखा मशिदीतल्या लाऊडस्पीकरवाल्यांकरता ही पुढे मागे चालू करण्याचा विचार आहे. इच्छुकांनी देणगी देण्यास हरकत नाही. फक्त ती रुपये पाच हजार आणि त्याच्या पटीत असावी)” असंही म्हणाले.

Tags: entertainmentmarathi actorvidyadhar joshividyadhar joshi post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
bigg boss 17 ankita lokhande’s mother vandana talk about vicky jain not slapped to actress video viral on social media

Bigg Boss 17 : "मी त्याला ओळखते तो…", विकी जैनने अंकिता लोखंडेवर हात उचलल्यानंतर अभिनेत्रीच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "तो माझ्याबरोबर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.