सतत चित्रीकरणामुळे घरापासून दूर असणारी ही कलाकार मंडळी त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून कुटुंबासह वेळ घालवताना दिसतात. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या मुलांबरोबरही क्वालिटी टाइम घालवताना दिसतो. अशातच एक मराठमोळे अभिनेते जे नेहमीच चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळ काढत त्याच्या बायको, मुलासह वेळ घालवताना दिसतात. हे अभिनेते म्हणजे वैभव मांगले. नाटक, मालिका व चित्रपट या सर्वच माध्यमांमध्ये आपला अभिनयाचा डंका वाजवत वैभव यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. केवळ अभिनयातच नाही, तर गायनामध्येही वैभव मांगले यांनी आपली झलक दाखवली आहे. (Vaibhav Mangale With His Children)
वैभव मांगले हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय राहतात. त्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांसह विविध फोटोज व व्हिडीओज शेअर करतात. शिवाय, ते विविध मुद्द्यांवरही परखडपणे भाष्य करताना दिसतात. त्यांचे काही मत कधी नेटकऱ्यांच्या पसंतीस पडतात, तर कधी खटकतात. अशातच वैभव यांनी त्यांच्या लेकाबरोबरचा शेअर केलेला एक व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये वैभव हे त्यांचा लेक समेहची उजळणी घेताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, “समेह तुला मी तिसऱ्यांदा बोलावतोय, ठेव तो मोबाईल आणि इकडे ये. शाळा सुरु झाली आहे अभ्यास करायला नको का?”, असं म्हणत वैभव त्यांच्या लेकाला हाताला धरुन शिकवणी घेत आहेत. काही प्रदेशातील देशांची नाव त्यांनी फळ्यावर लिहिली असून ती ते त्यांच्या लेकाला वाचायला सांगत आहे.
वैभव यांचा मुलगा समेहही अगदी कॉन्फिडन्समध्ये वाचतो, असं म्हणताना दिसत आहे. आणि इंग्रजी अक्षरांचे पूर्णपणे चुकीचे उच्चार तो उच्चारताना दिसत आहे. जापान, ब्राजील, सियानाडा, फिलीपिपिणीस असे देशांचे चुकीचे उच्चार तो करत आहे. यावर वैभव यांनाही हसू आवरलं नसून तो त्याला ओरडतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत, “माझ्या मुलाचे इंग्रजी वाचन”, असे कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’, ‘अलबत्या गलबत्या’ यांसारखी अनेक नाटकं त्यांची गाजली. शिवाय, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यपती’ ही मालिका व ‘टाईमपास’सारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. केवळ अभिनयातच नाही, तर गायन, सूत्रसंचालन व विनोदी कलाकार म्हणून त्यांनी चांगलं नाव कमावलं.