बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनधिकृत पब, बारवरील कारवाई अन्…; महाराष्ट्रातील ‘या’ मुद्द्यांवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचं रोखठोक भाष्य, म्हणाला, “ज्यांनी हे मोकाटपणे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 29, 2024 | 6:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Saurabh Gokhale Post

अनधिकृत पब, बारवरील कारवाई अन्…; महाराष्ट्रातील 'या' मुद्द्यांवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचं रोखठोक भाष्य, म्हणाला, "ज्यांनी हे मोकाटपणे…"

मुंबई, पुणे महानगरपालिकेकडून सध्या अनधिकृत पब्स आणि बारवर कारवाई करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचं सत्र जोरदार सुरु आहे. पुणे येथील पोर्श प्रकरणानंतर या हालचाली सुरु झाली असल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीच्या घटना समोर येत आहेत. यासंदर्भात एका मराठमोळ्या अभिनेत्याने एक चपखल अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणजे सौरभ गोखले. (Saurabh Gokhale Post)

सौरभने त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवरुन केलेली एक मार्मिक पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पुण्यातील अनधिकृत कारवाईवर अभिनेत्याने सडेतोड भाष्य केलं आहे. सध्या महानगरपालिका या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात व्यस्त आहेत. अशातच सौरभने हा मुद्दा उचलून धरला आहे. सौरभ नेहमीच न पटणाऱ्या मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य करताना दिसतो. पुण्यात मागील काही दिवसांपासून तरुण ड्रग्जचे सेवन करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर वाचा फोडणारी अशी पोस्ट शेअर करत सौरभने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा – ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत आहे अली गोनी, आधी हार्दिक पांड्याच्या पत्नीबरोबरही होत्या अफेअरच्या चर्चा

सौरभने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “शहरातील अनेक ई-लीगल पब्स आणि बार्सवर महापालिकेची कारवाई! पण हे अनधिकृत बार व पब बांधू देऊन इतकी वर्ष ज्यांनी मोकाट चालू दिले त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी?, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आलेली पाहायला मिळाली. आशयघन आणि आजूबाजूला घडणाऱ्या या विषयात थेट हात घालत सौरभने केलेलं भाष्य योग्य आहे.

आणखी वाचा – दोन-अडीच वर्ष लिव्ह-इन, त्यानंतर लग्न आणि…; आयुष्याच्या त्या निर्णयाबाबत अदिती सारंगधर स्पष्टच बोलली, म्हणाली…

अनेक मालिका, चित्रपट व नाटक यांमधून सौरभने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ‘राधा ही बावरी’ ही सौरभची मालिका विशेष गाजली. ‘मी नथुराम गोडसे’ या नाटकातून सध्या सौरभ रंगभूमी गाजवत आहे. या नाटकात त्याने मुख्य पात्र म्हणजेच नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे.

Tags: entertainmentmarathi actorsaurabh gokhaleSaurabh Gokhale Post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
kalki 2898 AD movie collection

प्रभास-दीपिकाच्या ‘कल्की २८९८ एडी’ची बॉक्स ऑफिसवर जादू, ‘या’ चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, दोन दिवसांत तब्बल इतकी कमाई

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.