मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्व गुण संपन्न अशी ओळख असलेला कलाकार म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडे पाहिलं जात. संकर्षण सध्या विविध नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.सध्या तो ‘तू म्हणशील तसं’, आणि ‘नियम व अटी लागू’ नाटकात काम करत आहे.यावेळी प्रेक्षकांचं वेगवेगळ्या रूपातून मिळणारं प्रेम संकर्षण सोशल मीडियावरून शेअर करतो.असाच त्याने नुकतंच एका लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केलाय.(sankarashan karhade)
अभिनयाबरोबरच संकर्षण एक संवेदनशील लेखक आणि कवी म्हणूनही ओळखला जातो.तो त्याच्या खाजगी आयुष्यावरील काही कविता देखील चाहत्यांसोबत शेअर करतो.यासोबत संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक लहान मुलगा ‘पंढरीच्या विठूराया..’ ही कविता ऐकवताना दिसत आहे.

प्लिज पहा , ऐका .. आपली लिहिलेली , सादर केलेली कलाकृती कुठल्या वयोगटाच्या प्रेक्षकांना , कित्ती आवडू शकते ह्याची पावती देणारा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा हा छोटा प्रेक्षक.. रसिक ..
“नियम व अटी लागू” च्या बालगंधर्व च्या प्रयोगानंतर ह्या छोट्या दोस्ताने माझी “पंढरीच्या विठूराया..” हि कविता मला खूप आवडते .. मी ती पाठ केली आहे .. आणि शाळेत सादर पण केली .. असं सांगत मनापासून म्हणुन दाखवली.. भेटायला आलेले सगळे प्रेक्षक थांबून त्याचा performance पाहात होते.. मी त्यातला थोडा भाग रेकाॅर्ड केला .. आणि शेअर करतोय.. असेच प्रेम करत रहा .. भेटत रहा .. असं म्हणत त्याने प्रेक्षकांचं प्रेम दाखवलं. तर हा व्हिडीओ चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरला असून चाहत्यांनी कमेंट वर्षाव केलाय.(sankarashan karhade)
हे देखील वाचा- म्हणून अशोक सराफ नानांना म्हणाले..’काय नान्या श्रीमंत झालास का?’
चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.या मालिकेत त्याने समीरची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.
