बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मृणाल-अभिजीतसारखं काम मी करुच शकत नाही”, ‘माझिया प्रियाला…” वरुन असं का म्हणाले संजय मोने?, सांगितला ‘तो’ प्रसंग

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 27, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sanjay mone interview

"मृणाल-अभिजीतसारखं काम मी करुच शकत नाही", 'माझिया प्रियाला…" वरुन असं का म्हणाले संजय मोने?, सांगितला 'तो' प्रसंग

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. अभिजीत खांडकेकर व मृणाल दुसानिस यांनी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे अभिजित व मृणाल ही जोडी लोकप्रियतेस आली. या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेचं सर्वत्र कौतुक झालं. या मालिकेत संजय मोने यांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. (sanjay mone interview)

‘द क्राफ्ट’ या युट्युब चॅनेलला नुकतीच संजय मोने यांनी एक मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना संजय मोने यांनी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेदरम्यानच्या आठवणी शेअर केल्या. संजय यांनी यावेळी बोलताना अभिजीत व मृणाल यांच्या अभिनयाचं व मेहनतीचं कौतुक केलं आहे. दोघांच्या मेहनतीबाबत त्यांनी एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून साऱ्यांना मालिकेच्या त्या दिवसाची आठवण ताजी झाली.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला साखरपुडा, लवकरच लग्नही करणार, कोण आहे ती मुलगी?

हा किस्सा सांगत संजय मोने म्हणाले, “त्या काळामध्ये मी अभिजीत, मृणालबरोबर काम करत होतो. मला आठवतंय एकदा सोमवारी त्यांचं चित्रीकरण सुरु झालं ते अगदी गुरुवारपर्यंत सतत सुरु होतं. आम्ही मधून मधून घरी जाऊन येत होतो. आम्ही घरुन जाताना त्यांना काहीतरी खायला बनवून घेऊन जात होतो. तितकं तरी त्यांना खायला मिळू दे असं वाटायचं. त्यांची चिकाटी खूप आहे. मी आयुष्यात कितीही पैसे दिले, एक बेट जरी दिलं तरी मी असं काम करु शकत नाही”.

आणखी वाचा – पारुच्या सौभाग्याची अग्निपरीक्षा घेणार नियती, मंगळसूत्र काढल्यानंतर आदित्यचा मोठा अपघात, अहिल्यादेवी कोलमडणार?

पुढे ते म्हणाले, “मी मुळात आळशी आहे. डेडिकेशनने कदाचित करेन परंतु इतक्या लांब कालावधीसाठी करु शकत नाही. दोन वर्षाचा असतो तेव्हाही केलं नाही आणि दोनशे वर्षाचा झालो तरीही करणार नाही. परंतु ही मालिका मला त्यांच्या कष्टामुळे लक्षात राहिली. दोघांनी अवर्णनीय काम केलं आहे. एखादा मोठा भोगदा दोन लोकांना खणावा लागला तर किती कष्ट करायला लागतील तेव्हढं काम त्यांनी केलं आहे. हे माझ्या लक्षात आहे”.

Tags: abhijeet khandkekar and mrunal dusanismajiya priyala prit kalenasanjay monesanjay mone interview
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Prathamesh Parab gave a special surprise to his wife Kshitija Ghosalkar on the occasion of five months of marriage and he shared the video on social media.

Video : लग्नाला पाच महीने पूर्ण होताच प्रथमेश परबने बायकोला दिल 'हे' खास सरप्राईज, मुंबई-पुणेऐवजी 'या' ठिकाणी केलं जंगी सेलिब्रेशन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.