शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार, थाटात पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 18, 2025 | 2:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rutwik talwalkar engagement

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार, थाटात पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल

rutwik talwalkar engagement : मराठी कलाविश्वात अनेक कलाकार मंडळी आहेत जे चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर करतात. काही कलाकार त्यांच्या नव्या घराची आनंदाची बातमी देतात, तर काही कलाकार लग्नाची, साखरपुड्याची, आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी देतात. अशातच आता मराठी मालिकाविश्वातील एका अभिनेत्याचा साखरपुडा झाला असल्याची गुडन्यूज समोर आली आहे. अभिनेत्याच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा मराठी अभिनेता म्हणजे ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता ऋत्विक तळवलकर. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका सुरु असून या मालिकेतील ऋत्विकचा साखरपुडा समारंभ पार पडला आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेला प्रेक्षकवर्ग भरभरुन प्रतिसाद देत आहे. मालिकेतील सगळीच पात्र रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेतील मुख्य अभिनेता अक्षर कोठारी म्हणजेच मालिकेतील अद्वैत चांदेकरने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. या पाठोपाठ मालिकेत अद्वैतच्या लहान भावाची भूमिका साकारणाऱ्या सोहमनेही त्याच्या आयुष्यात एक नवं पाऊल टाकलं आहे. सोहम म्हणजेच अभिनेता ऋत्विक तळवलकरचा साखरपुडा झाला आहे.

आणखी वाचा – जेजुरीत खंडोबाच राहायला येणार! ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्याच जेजुरीत होणार हक्काचं घर, भूमिपुजनाचे फोटो समोर

काही दिवसांपूर्वीच ऋत्विकने सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. ऋत्विकच्या गर्लफ्रेंडच नाव अनुष्का चंदक असे आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्याने चार वर्षांपासून तो रिलेशनशिप मध्ये असल्याची माहिती दिली. यानंतर आता अभिनेत्याचा साखरपुडा झाल्याचं समोर आलं आहे. साखरपुड्यासाठी ऋत्विकने काळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे. तर अनुष्काने शुभ्र पांढऱ्या रंगाची वेस्टर्न साडी नेसली आहे.

आणखी वाचा – “मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजींच्या ‘त्या’ वाक्याने जुई झालेली सुन्न, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “स्मशानात शांत झोपलेलं बघून…”

View this post on Instagram

A post shared by Rutwik Talwalkar (@rutwiktalwalkar)

“४ वर्षांचं रिलेशनशिप, ३ वर्षे लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप… या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहिली आहे”, असं म्हणत ऋत्विकने प्रेमाची कबुली दिली. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठी कलाविश्वातून ऋत्विकवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. आता ऋत्विक व अनुष्का खऱ्या आयुष्यात केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Tags: entertainmentmarathi actorrutwik talwalkar engagement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
ghabadkund marathi movie

भव्यदिव्य, खर्चिक आणि नेत्रदीपक सेटवर सुरुय 'घबाडकुंड'चे चित्रीकरण, कलाकारांची फौज मनोरंजनासाठी सज्ज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.