ajinkya joshi On Reel star : सोशल मीडियाच्या वाढत्या वापराने अनेक गणितं बदलली आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं प्रमाण खूप वाढलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या रील्सला प्रसिद्धी मिळत आहे. हे रील इतके व्हायरल होत आहेत की त्या रीलस्टारला एकप्रकारे पसंतीच मिळाली आहे. अनेक चाहते आहेत जे या रीलच्या विषयांना पसंती देतात. या रीलस्टारचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. आणि या फॉलोअर्सच्या वाढत्या संख्येने सिनेमात किंवा मालिकेत या रीलस्टारला संधी मिळाली आहे. आणि यामुळे अभिनयक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करत असलेल्या कलाकारांना काम मिळत नाही. यावर अनेकदा कलाक्षेत्रातील कलाकार मंडळींनी आवाज उठविला आहे.
अनेक दिग्गज कलाकार याबद्दल त्यांचं मत व्यक्त करतात. अशातच आता एका मराठी अभिनेत्यानंही रील्सस्टारबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे. इट्स मज्जा मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता अजिंक्य जोशीने रीलस्टारबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. अजिंक्यने असं म्हटलं की, “अनेकदा असं झालंय की, स्बस्क्राइबर्स आणि फॉलोअर्स बघून अनेकांना कास्टही केलंय आणि ज्यांनी कास्ट केलं तेसुद्धा आणि ज्यांना कास्ट केलं तेसुद्धा तोंडघाशी पडले आहेत. आता खूप तंत्रज्ञान बदललं आहे आणि ते शिकणं गरजेचं आहे”.
पुढे त्याने असं म्हटलं आहे की, “रील्सस्टार, जे म्हणतात ना. मला ३० सेकेंद द्या, मला आली ऍक्टिंग. अरे. पाठांतराचं काय? भाषेचं काय? तुम्ही फक्त लिप्सिंग करताय, समोरचा जे बोलतोय त्याच्यावर. तुमच्या भाषेचं काय? बाकीच्या एक्सरसाइजचं काय? स्पष्ट बोलण्याकरता काय करावं लागतं? यामुळे ते तोंडघाशी पडतायत”. आजवर अजिंक्य जोशीने अनेक चित्रपट-मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
आणखी वाचा – “एनर्जी कुठून आणू?”, चाहत्याच्या ‘त्या’ मॅसेजने संकर्षण कऱ्हाडे भारावला, म्हणाला, “आयुष्यभर…”
कामाबद्दल बोलताना अजिंक्य पुढे म्हणाला की, “‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेनंतर मी एका मालिकेसाठी, सावंतवाडीला शूटिंगसाठी गेलो. आता सगळं बदलत गेलंय. छोट्या गोष्टींसाठी काही कलाकारांना अव्हॉइड केलं जातं. माझं आधीचं काम बघून मला पुढची कामं मिळत गेली. पण आता असं झालंय की, मोठ-मोठ्या कलाकारांनाही ऑडिशन द्यावी लागते. मी नाही मानत स्वतःला मोठा, पण असं झालंय”.





