मंडळी काही चित्रपट हे जुने असले तरीही ते चित्रपट पाहताना अजूनही प्रेक्षकांना कंटाळा येत नाही. त्या चित्रपटातील विनोद हा अमर आहे असं म्हणायला हरकत नाही. असाच एक चित्रपट आपल्या मराठी सिने इतिहासात आहे तो म्हणजे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत या धमाल जोडीचा अफलातून आणि हिट ठरलेला ‘झपाटलेला’. (Unseen photos of Jhapatlela)

बाहुल्याच्या आधाराने अक्खा चित्रपट होऊ शकतो हा विचार सत्यात उतरवण्याचा काम केलं ते प्रसिद्ध दिगदर्शक महेश कोठारे ह्यांनी आणि त्यांना सोबत मिळाली त्यांच्या जिगरी दोस्ताची ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. बेर्डे यांच्या सोयाबीत अजून एक नाव आहे जे या चित्रपटाच्या यशात खूप महत्वाचं ठरलं ते म्हणजे पाध्ये कुटुंब.
बोलक्या बाहुल्यांच्या खेळात महारथ हासील असलेले सत्यजित पाध्ये यांनी झपाटलेला या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चित्रपटातील कधी समोर न आलेले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. चला तर पाहूया झपाटलेल्या तात्या विंचू चे काही unseen फोटोज

आज २०२३ साल आहे आणि आमच्या तात्या विंचूची लोकप्रियता प्रत्येक वर्षात वाढतच आहे. असं म्हणत सत्यजित यांनी काही भन्नाट फोटोज शेअर केले आहेत.(Unseen photos of Jhapatlela)

सोशल मीडियाच्या युगात आज त्याच्यावर अनेक memes बनत आहेत. सगळ्यात आशर्याची गोष्ट म्हणजे, जी मुलं १९९३ ला जन्माला सुद्धा आली नव्हती, त्यांना सुद्धा आमचा तात्या विंचू आवडतो.

तात्या विंचू हे पात्र सुद्धा भारतीय व मराठी सिनेमा च्या इतिहासातल एक अविभाज्य घटक बनलं.

पडद्यावर तात्याविंचू साकारताना करावी लागली होती ही मेहनत(Unseen photos of Jhapatlela)

पडद्यावर तात्याविंचू साकारताना करावी लागली होती ही मेहनत