गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठमोळ्या अभिनेत्याने सुरु केला नवा व्यवसाय, पारंपरिक व्यवसायाने जिंकली मन, कलाकारांनीही केलं कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 20, 2026 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Abhijeet Kelkar started business

मराठमोळ्या अभिनेत्याने सुरु केला नवा व्यवसाय, पारंपरिक व्यवसायाने जिंकली मन, कलाकारांनीही केलं कौतुक

Abhijeet Kelkar started business : गुढीपाडव्याचा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. या शुभ दिवशी अनेकजण आनंदाची बातमी देताना दिसतात. काही जण स्वतःच हक्काचे घर घेतात, काही जण गाडी खरेदी करतात तर काहीजण नव्या व्यवसायात पाऊल ठेवतात. हा शुभ दिवस सगळ्यांसाठीच खूप खास असतो. यंदाच्या गुढीपाडव्यानिमित्त अनेक कलाकारांनी नवीन घर घेत, गाडी घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने गुढीपाडव्याचे औचित्य साधत नव्या व्यवसायात पाऊल टाकल असल्याच सांगितलं आहे. हा मराठमोळा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. अभिजीत सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.

अशातच आता अभिजीतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नव्या व्यवसायात पाऊल टाकले असल्याची खुशखबर चाहत्यांना दिली आहे. यावेळी अभिनेत्याने कोणत्याही कपड्याचा वा हॉटेल बिजनेस न सुरु करता त्यानं थेट मसाल्यांचा व्यवसाय सुरु केला असल्याचं सांगितलं आहे. ‘अस्सल केळकर मसाले’, प्रत्येक घासात अस्सल चव, असं म्हणत त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

आणखी वाचा – भारती सिंहचा लेक दिसतो इतका क्युट, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, हुबेहूब…

View this post on Instagram

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

“गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माझा स्वतःचा मसल्याचा ब्रँड घेऊन आलोय… तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि प्रतिसाद हवाय…गणपती बाप्पा मोरया”, असं कॅप्शन देत त्याने नव्या व्यवसायाच्या नावाचा खुलासा केला आहे. अभिजीतच्या या पोस्टवर त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नाहीतर अनेक कलाकारांनीही यावर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्याने घेतली नवी गाडी; व्हिडीओ समोर

“अभिनंदन. ऑर्डर करते. लिस्ट पाठव काय काय आहे ते”, अशी कमेंट विशाखा सुभेदार यांनी केली आहे. तर याशिवाय सुकन्या मोने, अभिजीत खांडकेकर, शर्मिष्ठा राऊत, अभिषेक रहाळकर, पल्लवी पाटील, सुयश टिळक या कलाकारांनीही अभिजीतच्या नव्या व्यवसायावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: abhijeet kelkarentertainmentmarathi actornew business
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Next Post
Shiv Thakrey New Salon Open

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिव ठाकरेने सुरु केला नवा बिझनेस; ‘या’ शहरात केलं सलोनचं उद्घाटन; व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.