हिंदीसह मराठीतील अनेक कलाकारांच्या मुलांबाबत त्यांच्या प्रत्येक चाहत्याला जाणून घेण्याची आवडत असते. कलाकारांसह त्यांची मुलं काय करतात याविषयी प्रत्येकालाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. यात अनेक हिंदी कलाकार आपल्या मुलांविषयीची प्रत्येक अडपेट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांअ देत असतात. तर मराठीतीलही काही कलाकार मंडळी त्यांच्या मुलांविषयीची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात.
अशातच मराठीतील एक अभिनेता सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मराठी मालिकांसह ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेला अभिनेता अभिजीत केळकर त्याच्या कृतीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिजीत सध्या त्याच्या कुटुंबासह उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गावी गेला आहे. नुकताच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याची मुलं आजीसह रामरक्षा स्त्रोताचे पठन करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करत अभिजीतने असं म्हटलं आहे की, “माझ्या लहानपणी, आमच्या मूळ घराच्या अंगणातील याच ठिकाणी बसून माझी आजी आणि आम्ही (खूप) चुलत भावंडं, एकत्र बसून, संध्याकाळी देवाचं, पावकी-नीमकी (गावची भावंडं), पाढे म्हणत असू आणि या मे महिन्यात हा योग पुन्हा एकदा जुळून आला किंबहुना मी तो जुळवून आणला.”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “अनेक आठवणी पुन्हा एकदा डोळ्यांवाटे वाहून, माझ्या आजीला घरभर शोधून आल्या. पण ती कुठे दिसली नाही. तृप्तीने (अभिजीतची बायको) आमच्या नकळत काढलेला हा व्हिडिओ पाहिला आणि माझी आजी मला माझ्या आईत सापडली.” अभिजीतने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी त्याच्या मुलांचे कौतुक केले आहे.
या व्हिडीओखाली “खूप छान, फारच आवडलं, असेच संस्कार होणे महत्वाचे” अशा अनेक कमेंट्सद्वारे त्याच्या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, अभिजीतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तयो नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेमध्ये झळकला होता.