बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा व अमृता अरोरा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायका व अरोरा यांनी त्यांचे वडील गमावले. त्यांनी बांद्रा येथील आयशा मनोरच्या घराच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी केवळ तपास सुरु असून त्यानंतरच काही सांगता येईल, असे सांगितले आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे समोर आले आहे. मात्र हा अपघात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, आता या प्रकरणात एक नवीन अपडेट आली आहे. अभिनेत्रीचे वडील फोनवर शेवटचे कोणाशी बोलले याबाबतही खुलासा झाला. (Malaika Arora Father Death)
मलायका अरोरा व अमृता अरोरा १० सप्टेंबरच्या रात्री त्यांच्या आईच्या अपार्टमेंट आयशा मनोरमधून बाहेर पडताना दिसल्या. जी त्यांची वडिलांबरोबरची शेवटची भेट होती. आता एका पोलिस सूत्राने ‘इटाइम्स’ ला सांगितले, “कॉल डिटेल्स समोर आल्या आहेत. त्यांनी अमृता अरोराला शेवटचा कॉल केला होता, ती वडिलांच्या जवळ होती आणि त्यांची आवडती होती”. त्याचवेळी, ‘आज तक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अनिल मेहता यांनी त्यांच्या दोन्ही मुलींशी फोनवर चर्चा केली होती. पोलिसांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, “आत्महत्येपूर्वी अनिल यांनी मलायका व अमृता या दोघांशी सकाळी बोलून “मी आजारी आणि थकलो आहे” असे सांगितले होते. वृत्तात असेही सांगण्यात आले आहे की, अनिलने दोन्ही मुलींना सांगितले होते की तो त्याच्या आजारपणामुळे काळजीत आहे.
त्याचवेळी अभिनेत्रीची आई व कामगार हॉलमध्ये होते. सिगारेट ओढायची आहे, असे सांगून अनिल यांनी बाल्कनीत जाऊन आत्महत्या केली. मात्र, कुटुंबीयांकडून याला दुजोरा मिळालेला नाही. अनिल इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहत असल्याची पुष्टी मुंबई पोलिसांनी केली आहे. सूत्रांनी ‘इटाईम्स’ला सांगितले की, “अनिल त्याची माजी पत्नी जॉयसबरोबर एकाच मजल्यावर राहत होते आणि रोज सकाळी बाल्कनीत बसून वर्तमानपत्र वाचत असे. मात्र सकाळी पत्नी जॉयस तेथे गेल्यावर अनिल तेथे नव्हते. तिथे फक्त त्यांची चप्पल पडली होती”.
मलायका अरोराचे आई-वडील अनिल व जॉयस पॉलीकार्प यांचा घटस्फोट झाला जेव्हा ती फक्त ११ वर्षांची होती. अभिनेत्रीच्या आईने आपल्या दोन्ही मुलींचे संगोपन केले आहे. जे त्यांच्या विभक्त झाल्यानंतर चेंबूरहून ठाण्यात आले. मात्र, आता ते एकाच मजल्यावर राहत होते, तर मलायका वांद्रे येथे वेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच अर्जुन कपूर, सलीम खान, सलमा खान, हेलन, करीना कपूर, सैफ अली खान, सोहेल खान, सीमा सजदेह, किम शर्मा, रितेश सिधवानी आणि इतर अनेकजण शोक व्यक्त करण्यासाठी आयशा मनोरमध्ये पोहोचले. .