बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मालिकेत मोठं वळण, ‘झी मराठी’ वाहिनीवर चुरशीची लढत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 30, 2026 | 12:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Zee Marathi Serial

'सनई चौघडे', 'कमळी' आणि 'तारिणी'मालिकेत मोठं वळण, 'झी मराठी' वाहिनीवर चुरशीची लढत

Zee Marathi Serial : आपल्या आवडत्या मालिकेत पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला असते. प्रत्येक आठवड्यात कथा नव्या वळणावर येते आणि त्यातून प्रेक्षकांसाठी अनेक भावनिक, थरारक आणि अनपेक्षित क्षण घेऊन येते. म्हणूनच या आठवड्यात ‘सनई चौघडे’ , ‘कमळी’ आणि ‘ तारिणी’ या मालिकांमध्ये कोणते महत्त्वाचे प्रसंग पाहायला मिळणार आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील आजवर सगळ्याच मालिकांनी रसिकांच्या मनात घर केलं. ‘झी मराठी’ नेहमीच नवनवीन कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतं. सध्या सुरु असणाऱ्या सगळ्याच मालिकांमध्ये कथानकावरुन चुरशीची लढत सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

सनई चौघडे: पार्टीमध्ये जयची खोटी गर्लफ्रेंड बनण्याच्या प्रसंगामुळे शरु आणि जयमध्ये निर्माण झालेला तणाव एका अनपेक्षित घटनेनंतर बदलताना दिसणार आहे. पण अचानक आलेल्या अनपेक्षित वळणामध्ये जय शरूचा जीव वाचवणार आहे. आता त्यानंतर दोघांमधील नात्यात जवळीक निर्माण होईल का? हे बघणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे, लग्नाला विरोध करणारा जय, गौतम आणि असावरीच्या पाठीशी उभा राहत अंधश्रद्धेलाही न जुमानता त्यांना साथ देणार आहे. याशिवाय वटपौर्णिमेच्या विशेष भागही मालिकेत साजरा होणार आहे.

आणखी वाचा – मुलं नको म्हणून डिवोर्स; सुप्रसिद्ध सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाचे कारण ऐकून चाहते नाराज, म्हणाले…

कमळी: सरोजवर गोळीबार झाला. या धक्कादायक घटनेनंतर कमळी सरोजचे अंतिम संस्कार पार पाडते आणि तिच्या मृत्यूमागचे सत्य शोधण्याची शपथ घेते. त्यासाठी ती मुंबईकडे नवा प्रवास सुरू करणार आहे. या प्रवासात ती केवळ सत्याचा शोध घेणार नाही, तर स्वतःच्या भूतकाळाशीही सामना करणार आहे. अनेक अनोळखी धागे उलगडत असताना कमळीसमोर नवी आव्हाने उभी राहणार असून तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे सत्य समोर येण्याची चाहूल या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा लेक दिसतो इतका क्युट, पहिल्यांदाच दाखविला चेहरा, फोटो व्हायरल

तारिणी : केदारने घटस्फोटाच्या कागदांवर केलेल्या सहीमुळे तारिणी आणि केदारच्या नात्यात गैरसमज निर्माण होतो. मात्र याचदरम्यान केदार आपल्या मनातील प्रेमाची कबुली देत तारिणीला प्रपोज करतो. दुसरीकडे, तारिणी गुलाबची सखोल चौकशी करत असताना तिचे वरिष्ठ सा धू सर यांची बदली होऊन त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याचं कळणार आहे. या बदलांमुळे तपासाला नवे वळण मिळणार असून तारिणीसमोर अनेक नवी आव्हाने उभी राहणार आहेत.

Tags: entertainmentmarathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
vijaya mehta died

ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन, वयाच्या ९१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.